अरुण कदम म्हणतात तुमच्यासाठी काय पन…!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 09:55 IST2018-02-02T04:25:12+5:302018-02-02T09:55:12+5:30

खरंतर ह्या दोन शब्दांतच तुमच्यासाठी कायपन करायची धमक आणि तयारी दिसून येते ..ह्याच दोन शब्दांनी आता महाराष्ट्राला वेड लावलंय ...

Arun Kadam tells you what awaited ...! | अरुण कदम म्हणतात तुमच्यासाठी काय पन…!

अरुण कदम म्हणतात तुमच्यासाठी काय पन…!

ंतर ह्या दोन शब्दांतच तुमच्यासाठी कायपन करायची धमक आणि तयारी दिसून येते ..ह्याच दोन शब्दांनी आता महाराष्ट्राला वेड लावलंय ..कारण कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेला तुमच्यासाठी कायपन हा धमाल शो. या नावा प्रमाणेच यातले कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायपन करायची तायरी ठेवतात. याचा नुकताच अनुभव आला तो म्हणजे सगळ्यांचे आवडते अभिनेते अरुण कदम यांनी केलेल्या एका धाडसी कार्यामुळे ...अरुण कदम हे नाव आज महाराष्ट्राला अपरिचित नाही. त्यांचं नाव घेतलं कि डोळ्यासमोर येतो त्यांचा गोंडस  चेहरा..त्यावरचे हसरे भाव आणि त्यात दडलेला त्यांचा मनमिळाऊ स्वभाव .. अरुण दादांनी आजवर प्रेक्षकांच्या मनोरंजना साठी वाटेल ते केलंय ..कधी रंगभूमीच्या ओढीने नोकरीचा त्याग केला तर कधी शुटिंगशी केलेल्या कमिटमेंट मुळे काही आवडत्या क्षणांना मुकले ..पण त्यांचं एक वाक्य कायम राहील तुमच्यासाठी कायपन...
 
असा ह्या आपल्यासाठी कायपन करणाऱ्या अभिनेत्याने आता या कार्यक्रमातील भूमिकेसाठी स्वत: ची एक वेगळी ओळख असलेली मिशी देखील कापली आहे ..ही अशी मिशी जी खरंच त्यांची गेली 20 वर्षांपासूनची ओळख बनून राहिली होती.
 
याच मिशी वर त्यांची बायको त्यांच्या प्रेमात पडली होती.मात्र  जेव्हा ते त्यांची मिशी कापून घरी गेले तेव्हा  त्यांच्या मिसेस ने त्यांना घराबाहेरच थांबवलं ..मात्र त्यांनी जेव्हा सांगितलं माझं पाहिलं प्रेम प्रेक्षक आहेत आणि त्यांच्या साठी मला हे करणं भाग आहे तेव्हा त्यांच्या बायकोलाही याचा अभिमान वाटला .त्यांनीही अभिमानाने सांगितलं कि तुमच्यासाठी कायपन

Web Title: Arun Kadam tells you what awaited ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.