​कुमकुम भाग्यच्या विशेष भागात हे कलाकार लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 07:30 AM2018-01-13T07:30:12+5:302018-01-13T13:00:12+5:30

‘झी टीव्ही’वरील कुमकुम भाग्य ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील नेहमीच अव्वल असते. ही ...

This artist will be able to specialize in the special part of Kumkum fortune | ​कुमकुम भाग्यच्या विशेष भागात हे कलाकार लावणार हजेरी

​कुमकुम भाग्यच्या विशेष भागात हे कलाकार लावणार हजेरी

googlenewsNext
ी टीव्ही’वरील कुमकुम भाग्य ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील नेहमीच अव्वल असते. ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून या मालिकेत शब्बीर अाहुवालिया आणि श्रृती झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचा नायक अभी म्हणजेच शब्बीर हा रॉकस्टार असून प्रज्ञा म्हणजेच श्रृती झा ही अतिशय साधी मुलगी आहे. या मालिकेत श्रृती नेहमीच चष्मा घालत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यामुळे या मालिकेतील नायिका इतर मालिकेतील नायिकांप्रमाणे ग्लॅमरस नाहीये. पण तरीही ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. तसेच अभी आणि प्रज्ञा यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याने शब्बीर आणि श्रृती यांची जोडी प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेचा एक हजारावा भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. मालिकेचे हजार भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात एक विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच हजार भाग झाल्याबद्दल मेहेरबानो हे एक विशेष गाणे देखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे. या गाण्यात अभी आणि प्रज्ञा यांच्यासोबतच झी वाहिनीवरील विविध मालिकांमधील कलाकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. नरेन (अक्षय म्हत्रे), पूजा (शीन दास), देवी (येशा रुघानी), अधिराज ( कृप कपूर सुरी), निशा (मानसी साळवी), दिया (दिशा परमार), आदित्य (सुदीप साहिर), प्रेम (प्रणव मिश्रा), तेजस्विनी (ज्योती शर्मा), ऋषभ (मनित जौरा), सृष्टी (अंजुम फकीह) तसेच प्रीता (श्रद्धा आर्य) या ‘झी टीव्ही’वरील विविध मालिकांतील सर्व प्रमुख व्यक्तिरेखा मेहेरबानो या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. या गीताच्या चित्रीकरणाच्या वेळी या सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली. एवढेच नव्हे तर सेलिब्रेशनसाठी एक भला मोठा केक देखील आणण्यात आला होता. हा केक सगळ्यांनी मिळून कापला. 
कुमकुम भाग्य मालिकेचे यश साजरे करण्यासाठी झी टीव्हीने १५ जानेवारीला या मालिकेचा चार तासांचा एक विशेष भाग दाखवण्याचे ठरवले आहे. त्यात अभीच्या रॉक कार्यक्रमात या वाहिनीवरील सर्व प्रमुख मालिकांतील नायक-नायिकांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचे दाखवण्यात येणार आहे. या महाएपिसोडमध्ये अनेक नाट्यपूर्ण घटना घडणार असून प्रज्ञाला तिची हरवलेली बहीण प्रीता पुन्हा भेटणार आहे. शिवाय या रॉक कार्यक्रमात अभीच्या गिटारमध्ये एक टाइमबॉम्ब बसवण्यात आलेला असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागणार आहे. 

Also Read : कुमकुम भाग्य या मालिकेतील रुची सवर्णला काय झाले?

Web Title: This artist will be able to specialize in the special part of Kumkum fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.