अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:45 IST2025-10-17T11:45:34+5:302025-10-17T11:45:55+5:30
ग्रँड फिनाले आज होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या शोच्या विजेत्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय.

अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं?
Rise and Fall Winner: सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या रिअॅलिटी शोला टक्कर देणारा आणि अश्नीर ग्रोव्हरने होस्ट केलेला रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल' (Rise and Fall) सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी अभिनेते, डान्सर, पत्रकार, कॉमेडियन, स्पोर्ट्सपर्सन असे १५ जण स्पर्धक म्हणून सहभागी झाले. हा शो नुकताच अंतिम टप्प्यात पोहोचला. ग्रँड फिनाले १७ ऑक्टोबर रोजी होणार होता. मात्र, त्यापूर्वीच या शोच्या विजेत्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय.
'बिग बॉस तक'नं 'राइज एंड फॉल'च्या विनरचं नावच जाहीर करुन टाकलं आहे. अंतिम फेरीतील पहिले तिकीट अरबाज पटेलने मिळवले होते. त्यानंतर रुलर्स गटातील अर्जुन बिजलानी आणि धनश्री वर्मा यांच्यातही अंतिम फेरीसाठी चुरशीची स्पर्धा झाली. मात्र, आता 'बिग बॉस तक' अभिनेता अर्जुन बिजलानी याने 'राईज अँड फॉल'चा खिताब जिंकल्याची घोषणा केली आहे. या निकालावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. तर काहींनी 'बिग बॉस तक'ची ही बातमी खोटी असल्याचे फेटाळले आहे.
Arjun Bijlani is the WINNER of the Rise and Fall reality show.
— BBTak (@BiggBoss_Tak) October 16, 2025
Congratulations!!!! 👏
ग्रँड फिनाले आणि टॉप ६ स्पर्धक
या शोचा ग्रँड फिनाले आज, १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मनीषा राणी आणि बाली यांना बाहेर काढल्यानंतर, शोला त्यांचे टॉप ६ स्पर्धक मिळाले. यात आरुष, आकृती, अरबाज, अर्जुन, धनश्री आणि नयनदीप यांचा समावेश आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच अर्जुन बिजलानी विजेता ठरल्याच्या बातमीमुळे शोच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा शो Amazon MX Player किंवा Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.