‘अनुराग’च्या नायकावर कायदेशीर बडगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 02:20 IST2016-03-10T09:19:23+5:302016-03-10T02:20:19+5:30
डॉक्टर अंबरीष दरक लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘अनुराग’ या दोनच पात्रे ...
.jpg)
‘अनुराग’च्या नायकावर कायदेशीर बडगा!
डॉक्टर अंबरीष दरक लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘अनुराग’ या दोनच पात्रे असलेल्या, परंतु बहुआयामी आगामी चित्रपटाचा नायक धर्मेंद्र गोहेल हा चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर, चित्रपटाच्या कोणत्याही प्रसिद्धी कार्यक्रमांना उपस्थित राहिला नसल्यामुळे त्याने चित्रपटाच्या निर्मात्याबरोबर केलेल्या कराराचा भंग केला आहे. नुकसानभरपाई म्हणून डॉक्टर अंबरीष दरक यांनी वकिलांमार्फत नुकसानभरपाईचा दावा दाखल करणारी नोटीस पाठवली आहे. ११ मार्च २०१६ ला प्रदर्शित होणाºया या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना चित्रपटाची नायिका मृण्मयी देशपांडे एकटीच उपस्थित असायची. अभिनेता धर्मेंद्र गोहेल याला वेळोवेळी कळवूनसुद्धा त्याने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. त्यामुळे निर्मात्याला चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना अनेक ठिकाणी कमतरता जाणवत गेल्या. या प्रकरणातून निर्मात्याला झालेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसान पाहता, त्याने हे कायदेशीर पाऊल उचलले आहे.