अनुराग बासू करणार मालिकेचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 16:29 IST2017-06-10T05:38:45+5:302017-06-10T16:29:37+5:30
अनुराग बासूच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. कोशीश… एक आशा, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी झिंदगी की, कहानी ...

अनुराग बासू करणार मालिकेचे दिग्दर्शन
अ ुराग बासूच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. कोशीश… एक आशा, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी झिंदगी की, कहानी घर घर की यासारख्या प्रसिद्ध मालिका दिल्यानंतर तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर वळला आहे. लवकरच तो त्याची ‘इंतकाम एक मासूम का’ ही मालिका घेऊन येतो आहे. अनुरागला या मालिकेची कथा-आणि पटकथा आवडली आहे. इंतकाम मासूम का हि एक सूडकथा असून एका आठ वर्षांच्या मुलाची सूडकथा आहे तो आपल्यावरील अन्यायाचा बदला घेत असतो. या मालिकेत चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. त्यात ‘ट्य़ूबलाइट’फेम रिकी पटेल, गुणी अभिनेता अविनाश सचदेवा, मेघा गुप्ता तसेच मनीष गोएल यांचा समावेश आहे. आता या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घ्यावी, प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासू यांनी घ्यावी अशी गळ त्यांना मालिकेच्या निर्मात्यांनी घातली आहे.
“या मालिकेचा प्रत्येक भाग एखाद्या चित्रपटासारखा चित्रीत केला जाईल आणि प्रेक्षकांना चित्रपटातील भव्यतेचा अनुभव छोट्या पडद्यावर घेता यासाठी मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग बसू यांनी घ्यावी, असा आग्रह निर्मात्यांनी धरला आहे. अनुराग बासूने यांनी दिग्दर्शन करण्याल होकार दिला आहे. मात्र सध्या अनुराग बासू आपला आगामी चित्रपट जग्गा जासूसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्याच्याकडे सध्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वेळ नाही. त्यामुळे मालिका पुढे ढकलण्यात येणार आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनुराग बासू या छोट्या पडद्यावर परततील अशी आशा आहे.अनुराग बासू यांचा जग्ग जासूस चित्रपटाला रिलीजसाठी मुहुर्त मिळत नव्हता. येत्या 14 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.