आणखी एक टीव्ही कपल प्रेमात,पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:38 IST2017-12-13T10:05:07+5:302017-12-13T15:38:54+5:30
'इश्कबाज' मालिकेत अभिनेता कुणाल जयसिंग ओमकारा सिंग ओबेरॉयची भूमिका साकरत आहे. डॅशिंग लूक आणि अभिनयामुळे त्याने अल्पावधीतच रसिकांची पसंती ...

आणखी एक टीव्ही कपल प्रेमात,पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात
'इश्कबाज' मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिकेतील रंगत आणखी वाढणार आहे. ओबेरॉय बंधूंच्या जीवनावर अधिक झोत टाकणारी ‘दिल बोले ओबेरॉय' मालिकेचा 'इश्कबाज 'हा विस्तारित भाग आहे.इश्कबाज या मालिकेतील आगामी भागांमध्ये शिवाय म्हणजेच नकुल मेहता आणि अन्निका म्हणजेच सुरभी चंदना ओबेरॉय मॅन्शन सोडणार आहेत. रामायणामध्ये राम आणि सीता ज्याप्रकारे वनवासाला गेले होते, त्याचप्रमाणे हे जोडपे वनवासाला जाणार आहे. ही जोडी आपल्या घरच्यांपासून दूर जाऊन आपले आयुष्य नव्याने सुरू करणार आहे. शिवाय-अन्निका हे वनवासात गेल्यानंतर ओबेरॉय परिवारातील प्रत्येक व्यक्तिरेखा रामायणातील एक पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच मालिकेत रितू शिवपुरीची एंट्री होणार आहे.