अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन करणार शेती, महाराष्ट्रातील ‘या’ भागात खरेदी केली जमीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 18:17 IST2017-12-26T12:47:50+5:302017-12-26T18:17:50+5:30

‘भाभीजी घर पर हैं’ या अतिशय लोकप्रिय मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन लवकरच शेती करताना बघावयास ...

Anita Bhabhi alias Soumya Tandon farming, land bought in 'this' area of ​​Maharashtra! | अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन करणार शेती, महाराष्ट्रातील ‘या’ भागात खरेदी केली जमीन!

अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन करणार शेती, महाराष्ट्रातील ‘या’ भागात खरेदी केली जमीन!

ाभीजी घर पर हैं’ या अतिशय लोकप्रिय मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन लवकरच शेती करताना बघावयास मिळणार आहे. सौम्याने हा निर्णय कुठल्या शोमध्ये नव्हे तर वास्तविक जीवनात घेतला आहे. सौम्या शेती करण्याच्या तिच्या निर्णयाला एक चॅलेंज समजत असून, ती या निर्णयावर खूपच गंभीर आहे. शेतीसाठी सौम्याने महाराष्ट्रातील लवासा येथे जमीन घेतली आहे. याविषयी सौम्याने सांगितले की, मला सुरूवातीपासूनच शेती करण्याची इच्छा होती. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे मी ते करू शकली नाही. सौम्याने शेती करण्याच्या निर्णयावर म्हटले की, मी माझ्या शेती आणि मातीच्या काही चाचण्या केल्या असून, त्याचा रिजल्ट बघून मी खूपच उत्साहित आहे. 

दरम्यान, सौम्या बाजारात मिळणाºया भाजीपाल्याच्या दर्जावरूनही चांगलीच त्रस्त असल्याचे समजते. त्यामुळेच तिने स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. सौम्याने म्हटले की, काही दिवसांपूर्वीच मी नाशिक आणि सूरतमध्ये गेली होती. ज्याठिकाणी मला खूप चांगला ताजा भाजीपाला मिळाला. मात्र मुंबईमध्ये मिळणाºया भाजीपाल्याचा दर्जा आता पूर्वीसारखा राहिला नाही. मला आठवतेय की, लहानपणी खूपच चांगला भाजीपाला आणि फळे मिळत असत. मात्र आता आपल्याकडे चांगले बी-बियाणे नसल्याने लोक हायब्रिड बी-बियाणांचा आधार घेत आहेत. परिणामी चांगला भाजीपाला बाजारात मिळणे आता मुश्किल झाले आहे. या भाजीपाल्याचा आरोग्यावरही परिणाम होत असून, रोगराईचे प्रमाण वाढल्याचेही तिने सांगितले. 



सौम्या आॅर्गेनिक फार्मिंगमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरू इच्छिते. याविषयी सौम्याने म्हटले की, मी आॅर्गेनिक कॉस्मेटिक आणि मेकअप क्षेत्रात आहे. परंतु आता आॅर्गेनिक फार्मिंगमध्ये येण्याअगोदर मी संपूर्ण तयारी करू इच्छिते. त्याचबरोबर काही विषयांवर मला संशोधनही करायचे आहे. यावेळी सौम्याने हेदेखील स्पष्ट केले की, तिला तिच्या शेतीत कुठल्याही प्रकारचे केमिकल आणि पेस्टेसाइडचा वापर करायचा नाही. 

Web Title: Anita Bhabhi alias Soumya Tandon farming, land bought in 'this' area of ​​Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.