अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:40 PM2019-02-25T20:40:00+5:302019-02-25T20:40:00+5:30

'पटियाला बेब्ज'मध्ये अनिरुद्ध दवे आणि अशनूर कौर महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Anirudh Dave's Sweet Gesture for Ashnoor Kaur | अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू

अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू

googlenewsNext

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुरोगामी कार्यक्रम असणाऱ्या 'पटियाला बेब्ज'मध्ये अनिरुद्ध दवे आणि अशनूर कौर महत्वाच्या भूमिकेत आहेत.
अनिरुद्ध आणि अशनूरची पात्रे एकत्र येऊन बबिताच्या स्वतंत्र भविष्यासाठी सहकार्य करत आहेत. अशनूर आणि अनिरुद्ध बऱ्याच प्रसंगांसाठी एकत्र शूटिंग करतात आणि पडद्या बाहेरही त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे. अनिरुद्ध सादर करत असलेले पात्र हनुमान सिंग, गरजेनुसार मिनीसाठी सल्लागाराचे काम करत असतो आणि प्रत्यक्ष आयुष्यातही तो अशनूरची मदत करतो. 

अनिरुद्धबद्दल अशनूर सांगते,'मी त्याला अनिरुद्ध भैय्या हाक मारते. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि साहजिकच तो माझी तशीच काळजी घेतो. आम्ही एकमेकांना अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असतो. भैय्या बरोबर असताना आम्ही नेहेमी मजा करत असतो त्यामुळे एकही क्षण कंटाळवाणा होत नाही.'
अशनूर ह्या वर्षी १०वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहे आणि म्हणून मिळालेला सगळा मोकळा वेळ ती अभ्यास करत असते. तिचे कष्ट आणि निष्ठा बघून अनिरुद्धला तिच्यासाठी काहीतरी करावेसे वाटले. अनिरुद्ध म्हणाला,'अशनूर माझ्या लहान बहिणीसारखी आहे. ती एक मेहनती कलाकार तर आहेच पण त्याचबरोबर एक हुशार विद्यार्थिनीसुद्धा आहे. परीक्षेला जाणाऱ्या आपल्या कुटुंबातील मुलांना पेन भेट देणे ही एक परंपरा आहे आणि मी तेच केले. मी त्या पेनाद्वारे हाजी अली आणि गुरुद्वाराचा आशीर्वाद तिच्यापर्यंत पोचवला आहे आणि मला खात्री आहे की अशनूर घेत असलेल्या कष्टांचे तिला नक्की फळ मिळेल.'
पटियाला बेब्ज पहा दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वाजता फक्त सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

 

Web Title: Anirudh Dave's Sweet Gesture for Ashnoor Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.