n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">अनिल कपूरने 24च्या दुसऱ्या सिझनसाठी खूपच मेहनत घेतली आहे. त्याची भूमिका पहिल्या सिझनपेक्षा अधिक चांगली व्हावी यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले आहेत. अनिलने काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या निमित्ताने रॉच्या काही अधिकाऱ्यांना भेटीदेखील दिल्या होत्या. त्यांच्याकडून त्याने त्यांच्या कामकाजाविषयी जाणून घेतले. रॉच्या अधिकाऱ्यांचे कामाचे तास हे खूपच जास्त असतात. त्यामुळे त्यांना कामाच्यावेळी झोप येऊ नये यासाठी ते कपाळाला खूप सारा बाम लावतात. अनिलने या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी त्यांची ही युक्ती वापरली असल्याचे तो सांगतो. तसेच या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्याने गृहमंत्र्यांचीदेखील भेट घेतली होती.