पार्टी म्हटले कि आपण कोणता ड्रेस घालायचा, कोणती ज्वेलरी त्यावर मॅच होईल, मेकअप अन ...
अमृता रेडी फॉर पार्टी
/> पार्टी म्हटले कि आपण कोणता ड्रेस घालायचा, कोणती ज्वेलरी त्यावर मॅच होईल, मेकअप अन आॅल या गोष्टींचा विचार सर्वात जास्त केला केला जातो. मग जर एखाद्या पार्टीमध्ये अभिनेत्रींना जायचे असेल तर त्यांची तयारी तर विचारुच नका. पार्टीचे सेंटर आॅफ अॅट्रॅक्शन असणाºया या तारकांना एकदम ग्लॅमरस लुक परिधान करुन त्या पाटीर्ची शान वाढवावी लागते. आता पहा ना आपली मराठमोळी अमृता खानविलकरने देखील एका पार्टीसाठी अशीच खास तयारी केली होती. ब्लॅक कलरचा सुंदर वनपिस अमृताने परिधान करुन त्या लुकमधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी अपलोड केले होते. अमृता तुझ्या या हटके ग्लॅमरस लुकवर तुझे चाहते नक्कीच फिदा झाले असतील.