आम्रपाली गुप्ताला आली चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:50 IST2016-01-16T01:05:57+5:302016-02-05T10:50:25+5:30
'अधुरी कहानी हमारी..' च्या सेटवर आम्रपाली गुप्ताला चक्कर आली. ती सात महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या 'कुबूल है' या मालिकेतील ...

आम्रपाली गुप्ताला आली चक्कर
' ;अधुरी कहानी हमारी..' च्या सेटवर आम्रपाली गुप्ताला चक्कर आली. ती सात महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या 'कुबूल है' या मालिकेतील खलनायकी भूमिकेमुळे तिला या नव्या मालिकेत घेण्यात आलंय. ती साकारत असलेले पात्रही गर्भवती दाखवलंय. तिच्यासाठी ही शूट वेगात सुरू होतं. तेव्हा तिला गुदमरल्यासारखं झालं व ती चक्कर येऊन पडली. तिची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन तिचं शूट तीन दिवसांत अटोपतं घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्रपालीनं सांगितलं, की मला दोन दिवसांपासून बरं नव्हतं. मी थकलेले होते. माझ्यासाठी त्यांनी वेगानं शूट संपवण्याचा निर्णय घेतला असावा. फक्त मला याची कल्पना दिली गेली. निर्माता गुल यांनी सांगितले, की आम्रपालीच्या पात्राला ब्रेक देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.