अमिताभ बच्चन यांची ट्रेनर वृंदा मेहता इंडियाज असली चॅम्पियन... है दम या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2017 09:17 AM2017-04-19T09:17:28+5:302017-04-19T14:47:28+5:30

अमिताभ बच्चन यांनी आज सत्तरी पार केली असली तरी ते त्यांच्या वयाच्या मानाने खूपच फिट आहेत. त्यांच्या या फिटचे ...

Amitabh Bachchan's trainer, Vrinda Mehta India's real champion ... is in the series | अमिताभ बच्चन यांची ट्रेनर वृंदा मेहता इंडियाज असली चॅम्पियन... है दम या मालिकेत

अमिताभ बच्चन यांची ट्रेनर वृंदा मेहता इंडियाज असली चॅम्पियन... है दम या मालिकेत

googlenewsNext
िताभ बच्चन यांनी आज सत्तरी पार केली असली तरी ते त्यांच्या वयाच्या मानाने खूपच फिट आहेत. त्यांच्या या फिटचे श्रेय त्यांच्या जीवनशैलीला जाते. त्याचसोबत त्यांच्या फिटनेसमध्ये त्यांची ट्रेनर वृंदा मेहताचा मोठा वाटा आहे. वृंदा त्यांना खाण्याविषयी आणि व्यायामाविषयी नेहमीच सल्ला देत असते. हीच वृंदा आता प्रेक्षकांना इंडियाज असली चॅम्पियन... है दम या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धक त्यांच्या शारिरिक आणि मानसिक ताकदीची परीक्षा देणार आहेत आणि त्यातून विजेत्याची  निवड केली जाणार आहेत. शारिरिक क्षमतेने हार मानल्यानंतर स्पर्धक फक्त इच्छाशक्तीच्या बळावर किती पुढे जाऊ शकतात हे पाहिले जाणार आहे. त्यामुळेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धकांना मानसिक पातळीवरही आपल्यातील ऊर्जेला योग्य मार्ग दाखवावे लागतील. या कामात वृंदा या स्पर्धकांना मदत कणार आहे. वृंदा सगळ्या स्पर्धकांसोबत वैयक्तिकरित्या काम करून त्यांच्या क्षमता, मर्यादा विस्तारून त्यांना चॅम्पियन बनण्यास मदत करणार आहे. याबद्दल वृंदा सांगते, "या कार्यक्रमाद्वारे मी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे याचा मला आनंद होत आहे. या कार्यक्रमाचा विषय खूप चांगला असून सगळे स्पर्धक त्यांना काय करायचे यावर ठाम आहेत. त्यांच्यातील उत्साह पाहून मला प्रचंड आनंद होत आहे. सुनील शेट्टी हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव खूपच चांगला आहे. त्यांच्यासोबत मी काही वर्षांपूर्वी देखील काम केले होते. ते स्वभावाने अगदी शांत आणि स्पष्टवक्ते आहेत. या कार्यक्रमाचा माझा अनुभव खूपच चांगला आहे."



Web Title: Amitabh Bachchan's trainer, Vrinda Mehta India's real champion ... is in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.