KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?

By अमित इंगोले | Updated: November 4, 2020 09:11 IST2020-11-04T09:11:40+5:302020-11-04T09:11:58+5:30

'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं.

Amitabh Bachchan says will apologize Shahrukh Khan kbc contestant | KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?

KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?

KBC १२ च्या सेटवर एक अशी महिला स्पर्धक आली होती जिने आपल्या क्यूट अंदाजाने सर्वांची मने जिंकली. अमिताभ बच्चनही या स्पर्धकावर खूश दिसून आले. पण जेव्हा ही स्पर्धक म्हणाली की, ते एका गोष्टीवरून अमिताभ बच्चन यांच्यावर नाराज आहे तर अमिताभ यांचीही उत्सुकता वाढली. स्पर्धक म्हणाली की, शाहरूख खान हा तिचा फेव्हरेट अभिनेता आहे आणि जेव्हा अमिताभ यांनी शाहरूखला 'मोहब्बतें' मध्ये रागावलं होतं तेव्हा तिला फारच वाईट वाटलं होतं.

यावर अमिताभ बच्चन हे त्यांच्या सफाईत वेगवेगळ्या गोष्टी सांगतात पण स्पर्धक काही ऐकायला तयार होत नाही. उलट अमिताभ बच्चन म्हणतात की, मी नाही तर शाहरूखनेच मला सिनेमात रागावलं होतं. पण दिल्लीहून आलेली स्पर्धक रेखा राणीने बिग बी यांचं काहीच ऐकलं नाही. नंतर स्पर्धक म्हणते की, 'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं. (KBC : खेळासंबंधी पहिल्याच प्रश्नावर अडकला स्पर्धक, घ्यावी लागली लाइफलाईन....)

शाहरूखला माफी मागण्यास तयार

अखेर अमिताभ बच्चन म्हणतात की, त्यांना दु:खं आहे की, त्यांनी रेखा राणी यांचं मन दुखवलं. ते हात जोडून शाहरूख खानला माफी मागतात आणि जेव्हाही ते शाहरूखला भेटतील तेव्हा त्यालाही यासाठी माफी मागतील. तेव्हा कुठे स्पर्धक रेखा राणी खूश झाली. (KBC : खेळासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने वापरल्या दोन लाइफलाईन, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?)

रेखा राणी यांचं जीवन फार गरीबीत गेलं आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात. रेखाला केबीसीच्या सेटवरून खूप जास्त रक्कम जिंकायची आहे. 

दरम्यान महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड किंग शाहरूख खान मोहब्बतें आणि कभी खुशी कभी मग मध्ये एकत्र दिसले होते. या सिनेमातील दोघांच्याही परफॉर्मन्सचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.
 

Web Title: Amitabh Bachchan says will apologize Shahrukh Khan kbc contestant