कौन बनेगा करोडपती 13 लवकरच होणार सुरू, या तारखेपासून करू शकाल रजिस्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:19 IST2021-05-05T16:18:08+5:302021-05-05T16:19:50+5:30

या कार्यक्रमाचा पुढचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येईल याची ते आतुरतेने वाट पाहात असतात.

Amitabh Bachchan returns with a new season of Kaun Banega Crorepati; watch promo | कौन बनेगा करोडपती 13 लवकरच होणार सुरू, या तारखेपासून करू शकाल रजिस्ट्रेशन

कौन बनेगा करोडपती 13 लवकरच होणार सुरू, या तारखेपासून करू शकाल रजिस्ट्रेशन

ठळक मुद्दे2021 च्या जानेवारी महिन्यात कौन बनेगा करोडपतीचा 12 वा सिझन संपला होता.

अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. अमिताभ आणि कौन बनेगा करोडपती यांचे नाते खूपच खास आहे. अमिताभ यांची सूत्रसंचालन करण्याची स्टाईल, स्पर्धकांशी संवाद साधण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा पुढचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येईल याची ते आतुरतेने वाट पाहात असतात. आता या कार्यक्रमाचा पुढचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कौन बनेगा करोडपती 13 लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन 10 मे पासून करता येणार आहे. सोनी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओत कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपल्याला अमिताभ बच्चन यांना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओद्वारे अमिताभ यांनी कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशन बाबत माहिती दिलेली आहे.

2021 च्या जानेवारी महिन्यात कौन बनेगा करोडपतीचा 12 वा सिझन संपला होता. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे या  कार्यक्रमाच्या टीमचे आभार मानले होते. 

Web Title: Amitabh Bachchan returns with a new season of Kaun Banega Crorepati; watch promo