अमिताभ बच्चन यांनी वाहिली विनोद खन्नाना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:53 IST2017-12-21T08:23:32+5:302017-12-21T13:53:32+5:30

स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌सच्या मंचावर महानायक अमिताभ बच्चन यांनी कलाकरांनी सजलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आणखी शोभा वाढवली. या कार्यक्रमामध्ये ...

Amitabh Bachchan commemorates Wahily Vinod Khanna | अमिताभ बच्चन यांनी वाहिली विनोद खन्नाना श्रद्धांजली

अमिताभ बच्चन यांनी वाहिली विनोद खन्नाना श्रद्धांजली

टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌सच्या मंचावर महानायक अमिताभ बच्चन यांनी कलाकरांनी सजलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आणखी शोभा वाढवली. या कार्यक्रमामध्ये ते मस्त काळ्‌या रंगाच्या सूटमध्ये उपस्थित होते.

स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात एलियाना डिक्रूझने बादशाहो मधील मेरे रश्क ए करम या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स सादर केला. याशिवाय टायगर श्रॉफ, तापसी पन्नू आणि क्रिती सेनॉन यांनी देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिले. या पुरस्काराचा ग्रॅन्ड फिनाले परफॉर्मन्स खुद्द दबंग खानने दिला. जुडवाचे दोन सुपरहिट चेहरे सलमान खान आणि वरूण धवन यांनी पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली. पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षितने वरूण धवनसोबत तम्मा तम्मा या गाण्यावर ताल धरला आणि प्रेक्षकांनाही धरायला भाग पाडला. 

अमिताभ बच्चन यांनी अभिनेता विनोद खन्नांचे त्यांची पत्नी कविता खन्नासोबतचा एक जुना फोटो अनावृत्त केला आणि त्यानंतर विनोद खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनी या दिवंगत अभिनेत्यासोबत आपला खासगी आणि प्रोफेशनल प्रवासाच्या आठवणी सांगितल्या.

“त्या काळात चित्रपटांसाठी भारी बजेट नसायचे आणि आम्ही परिस्थितीनुसार तडजोडी करायचो. त्या काळात आम्ही एकाच रूममध्ये, तंबूमध्ये राहायचो. विनोदजींसोबत काम करणे हा माझा सन्मान आणि एक सुंदर अनुभव होता.” असे अमिताभ बच्चन म्हणाले.  

विनोद खन्ना यांनी बॉलिवूडबरोबरच राजकारणातही आपला ठसा निर्माण केला होता. पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात २००२ मध्ये ते केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही पार पाडली होती.  

१९६८ ते २०१३ यादरम्यान त्यांनी १४१ चित्रपटांत काम केले आहे. ‘दयावान’ चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर आहे. त्याचबरोबर ‘अमर अकबर अँथोनी, द बर्निंग ट्रेन, मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, कुर्बानी, कुदरत या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. 

Web Title: Amitabh Bachchan commemorates Wahily Vinod Khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.