​अमित टंडन आणि शरद मल्होत्रामध्ये सुरू आहे कोल्ड वॉर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 12:26 IST2017-08-21T06:56:33+5:302017-08-21T12:26:33+5:30

अमित टंडन कसम तेरे प्यार की या मालिकेत अभिषेक खुराणा ही व्यक्तिरेखा साकारत आहे तर शरद या मालिकेत मुख्य ...

Amit Tandon and Sharad Malhotra are in the cold war? | ​अमित टंडन आणि शरद मल्होत्रामध्ये सुरू आहे कोल्ड वॉर?

​अमित टंडन आणि शरद मल्होत्रामध्ये सुरू आहे कोल्ड वॉर?

ित टंडन कसम तेरे प्यार की या मालिकेत अभिषेक खुराणा ही व्यक्तिरेखा साकारत आहे तर शरद या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. पण या दोघांमध्ये सगळे काही आलबेल सुरू नसल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. 
शरद या मालिकेत सुरुवातीपासून मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत अमितची एंट्री झाल्यापासून शरदच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे. शरद आणि अमित यांच्यात सगळे काही सुरळीत असल्याचे आजवर सगळ्यांना वाटत होते. पण या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच चांदिवली येथील एका स्टुडिओत सुरू असताना त्यांच्यातील धुसफूस लोकांना पाहायला मिळाली. 
कसम तेरे प्यार की या मालिकेचे दिग्दर्शन मुझ्झमिल करत आहेत. या मालिकेच्या एका दृश्यात त्यांना क्रितिका सेनगर, शरद मल्होत्रा एकत्र हवे होते. त्यामुळे मुझ्झमिलने शरदला या दृश्याबाबत विचारले असता त्याला ते दृश्य इतके महत्त्वाचे वाटले नाही. त्यामुळे त्याने या दृश्याचे चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे दिग्दर्शकाने ते दृश्य क्रितिका आणि अमितसोबत चित्रीत करण्याचे ठरवले. आता आपल्याऐवजी दृश्य अमित चित्रीत करत आहे हे शरदला कळल्यावर त्याला ते पटले नाही आणि त्याने लगेचच चित्रीकरणासाठी होकार दिला. त्या दृश्यासाठी दिग्दर्शकाची पहिली चॉईस शरदच असल्याने त्याने अमित ऐवजी शरदसोबत ते चित्रीकरण केले. पण या सगळ्या गोष्टीमुळे शरद आणि अमितमध्ये असलेले कोल्ड वॉर सगळ्यांना दिसून आले. 

sharad malhotra

Also Read : ​या कारणामुळे कसम तेरे प्यार की फेम अमित टंडनची पत्नी पोहोचली जेलमध्ये

Web Title: Amit Tandon and Sharad Malhotra are in the cold war?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.