...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:23 PM2021-05-24T14:23:04+5:302021-05-24T14:28:52+5:30

सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

Ameya khopkar Angry on Indian Idol Host Aditya Narayan | ...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा

...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा

googlenewsNext

'वाद' आणि 'इंडियन आयडल' हे समीकरण काही नवं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो रोज वादात अडकतो. इंडियन आयडलमध्ये होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ''राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या'' ? असे म्हटले होते. 

आदित्यच्या अशा बोलण्यावरुनच नवा वाद  उफाळला आहे. अलिबाग विषयी असे बोलणे रसिकांनाही चांगलेच खटकले आणि आदित्यचे नॅशनल चॅनेवर असे काही बोलण्यावर रसिकांनाही चांगलाच संताप व्यक्त केला. इतकेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला खडसावले आहे. 

 

अमेय खोपकर यांनी फेसबुकद्वारे लाईव्ह येत शोबद्दल संताप व्यक्त केला आहे. हिंदी चॅनेवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही? आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय..? ''अलिबागकरांचा हा अपमान आहे.ही कोणती बोलायची पद्धत झाली.मनसे चित्रपट सेनेकडूनही या गोष्टीचा निषेध करतोय. 

आदित्य नारायण यांचे वडिल उदित नारायण यांनाही घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटलंय . तसेच सोनी चॅनेललाही आगामी भागात अलिबागच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले आहे. सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यापुढे असे काही अपमानास्पद ऐकायला मिळाले तर  योग्य ती कारवाई केली जाणार असेही त्यांनी सांगितले आहे. 

Web Title: Ameya khopkar Angry on Indian Idol Host Aditya Narayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.