अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'तू अनोळखी तरी सोबती'मधून येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:41 IST2025-12-30T17:40:56+5:302025-12-30T17:41:35+5:30

Ambar Ganpule and Yogita Chavan : 'तू अनोळखी तरी सोबती' या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी येत्या ५ जानेवारीपासून भेटीला येणार आहे.

Ambar Ganpule and Yogita Chavan will be seen together for the first time, they will meet in 'Tu Anolakhi Tari Sobti' | अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'तू अनोळखी तरी सोबती'मधून येणार भेटीला

अंबर गणपुले आणि योगिता चव्हाण पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'तू अनोळखी तरी सोबती'मधून येणार भेटीला

'सन मराठी'वर 'तू अनोळखी तरी सोबती' या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी येत्या ५ जानेवारीपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता व समीर या दोघांची ही कथा असून, नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील? नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ?  हे पाहणं रंजक असणार आहे.
 
या मालिकेत अर्पिता हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली की, " या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक नवीन पात्र घेऊन प्रेक्षकांसमोर मी येत आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक, आनंद अश्या भावना आहेत. अर्पिता हे पात्र अगदीच साधं, सुशील, कुटुंबाचा विचार करणारी, प्रत्येकाचं मन जपणारी मुलगी आहे. ही एका चाळीत राहणाऱ्या मुलीची गोष्ट असल्याने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना आपलंस करुन घेणारी ठरेल. अर्पिता आणि योगिता मध्ये प्रचंड फरक आहे. अर्पिता कधीच स्वतःसाठी जगली नाही, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत राहणारी ती व्यक्ती आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यातही अशी एक व्यक्ती येईल तेव्हा खरंच मॅजिक होईल. मी सुद्धा गेली २१ वर्ष ठाणे येथील किसननगर चाळीत राहिली आहे. त्यामुळे चाळीत शूटिंग करण्याचा आंनद काही वेगळाच आहे. या मालिकेमुळे चाळीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय. प्रेक्षकांना आमची नवी मालिका आणि अर्पिता हे पात्र नक्की आवडेल ही खात्री आहे."


मालिकेत समीर हे पात्र साकारणारा अभिनेता अंबर गणपुले म्हणला की," दोन अनोळखी व्यक्तींची ही कहाणी आहे. समीर हे पात्र खूप सौम्य, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारा आहे. कायम चेहऱ्यावर स्मित हास्य, नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक गोष्टी आत्मसात करणारा आहे. त्यामुळे या पात्राकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मालिकेचा प्रोमो पाहून बऱ्याच जवळच्या माणसांनी कौतुक केलं. मालिकेचा विषय, साधेपणा या सगळ्याच गोष्टी मालिकेविषयी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. मी चाळीत कधी राहिलो नाही. पण ते जीवन मी लहानपणीच्या सुट्यांमध्ये अनुभवलं आहे. चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि आता समीरमुळे मला चाळीतलं जीवन जगायला मिळतंय. नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे ५ जानेवारी पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी सुद्धा खूप उत्सुक आहे."

Web Title : अंबर गणपुले और योगिता चव्हाण 'तू अनोळखी तरी सोबती' में साथ

Web Summary : अंबर गणपुले और योगिता चव्हाण 5 जनवरी से सन मराठी पर 'तू अनोळखी तरी सोबती' में हैं। यह श्रृंखला मुंबई की चॉल में रहने वाले अर्पिता और समीर की कहानी है, और कैसे उनके जीवन दोस्ती और प्यार का एक अनूठा बंधन बनाते हैं।

Web Title : Ambar Ganpule and Yogita Chavan together in 'Tu Anolakhi Tari Sobati'

Web Summary : Ambar Ganpule and Yogita Chavan star in 'Tu Anolakhi Tari Sobati' on Sun Marathi from January 5th. The series explores the story of Arpita and Sameer, living in Mumbai's chawls, and how their lives intertwine, creating a unique bond of friendship and love.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.