छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण - संजय कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:45 IST2017-11-02T09:15:53+5:302017-11-02T14:45:53+5:30
काम नव्हते म्हणून मी छोट्या पडद्यावर परतलो असे नाही तर, मला सुरुवातीपासूनच छोट्या पडद्याचे आकर्षण आहे- संजय कपूर

छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण - संजय कपूर
< strong>सतीश डोंगरे
इंडस्ट्रीमध्ये कितीही मोठा स्टार असला तरी, त्याला छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. आजही मोठमोठे सुपरस्टार छोट्या पडद्यावरील विविध शोमध्ये काम करताना दिसतात. आता या यादीत आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची भर पडली आहे. होय, ५२ वर्षीय अभिनेता संजय कपूर ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर परतला आहे. ‘राजा’ फेम संजय कपूर २००३ मध्ये ‘करिश्मा : द मिरेकल्स आॅफ डेस्टिनी’ या शोमध्ये अखेरीस बघावयास मिळाला होता. तब्बल १४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणाºया संजयशी संवाद साधला असता, त्याने छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण असल्याचे म्हटले आहे.
प्रश्न : तब्बल १४ वर्षांनंतर तू छोट्या पडद्यावर परतत आहेस, या नव्या इनिंगबद्दल काय सांगशील?
- होय, बºयाच काळानंतर मी छोट्या पडद्यावर परतत आहे. २००३ मध्ये मी अखेरीस छोट्या पडद्यावर काम केले होते. या मधल्या काळात माझ्याकडे काम नव्हते असे नाही. कारण याकाळात मी बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली. शिवाय काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला. छोट्या पडद्यावर परतण्यासाठी मी संधीच्या शोधात होतो. दुर्दैवाने या काळात मला संधी मिळाली नाही. आता सगळे योग जुळून आल्याने मी, छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. खरं तर मला सुरुवातीपासूनच छोट्या पडद्याचे आकर्षण राहिले आहे.
प्रश्न : या मालिकेत तू २३ वर्षांच्या स्मृतीबरोबर रोमान्स करताना दिसत आहेस, काय सांगशील?
- होय, पण मी तुम्हाला एक गोष्ट अगोदरच स्पष्ट करू इच्छितो की, स्मृतीचे वय २३ वर्ष नाही. कारण ती २३ वर्षांपेक्षा मोठी आहे हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. मुळात या मालिकेची संपूर्ण कॉन्सेप्ट एका लव्हस्टोरीवर आधारित आहे. एक विवाहित व्यक्ती ज्याला मुले आहेत, परंतु त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे, अशा व्यक्तीची आणि स्मृतीची लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. खरं तर स्मृती खूपच प्रगल्भ अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना मला एकदाही असे वाटले नाही की, ती नवोदित आहे. शिवाय स्मृती खूप सुंदर असल्याने तिच्यासोबत काम करताना यासर्व गोष्टी सहज घडत गेल्या. मला असे वाटते की, तिची आणि माझी केमिस्ट्री खूपच चांगली जमली असून, पडद्यावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
प्रश्न : ‘शानदार’मध्ये एकत्र काम केल्यानंतर निक्की वालिया अन् तू या मालिकेत पुन्हा एकदा एकत्र आले आहात, तुमच्यातील केमिस्ट्रीबाबत काय सांगशील?
- ‘शानदार’मध्ये जरी आम्ही एकत्र काम केले असले तरी, त्यावेळी आमच्यातील सीन फारच कमी होते. आता आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो असून, निक्कीसोबत काम करताना खूपच चांगला अनुभव आला आहे. निक्की एक चांगली अभिनेत्री आहे. सेटवर जेव्हा-केव्हा ती आजूबाजूला असते तेव्हा ती चेष्टामस्करी करीत असते. ‘शानदार’ शूटिंगदरम्यानही आम्ही खूप धमाल केली होती. आता पुन्हा एकदा या मालिकेत आम्ही एकत्र आलो आहोत. तिच्यासोबतच्या केमिस्ट्रीबाबत माझ्यापेक्षा प्रेक्षक चांगले सांगतील असे मला वाटते.
प्रश्न : विक्रम भट्टसोबतची तुझी मैत्री सर्वश्रुत आहे, तुमच्यातील हीच मैत्री तुला या शोपर्यंत घेऊन आली काय?
- मैत्री आणि काम या दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत, असे मी मानतो. जेव्हा विक्रम माझ्याकडे या मालिकेची स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मी त्याला नकार देऊ शकलो नाही. कारण स्क्रिप्ट मला खूपच प्रभावित करणारी होती. खरं तर आम्ही गेल्या काही काळापासून एका चांगल्या स्क्रिप्टवर काम करीत होतो. अखेर ती स्क्रिप्ट आम्हाला मिळाली. विक्रम आणि माझ्यातील मैत्रिबद्दल सांगायचे झाल्यास, मी त्याला गेल्या वीस वर्षांपासून ओळखतो. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळेदेखील मी या मालिकेचा भाग बनलो असे म्हटले तर त्यात चुकीचे ठरू नये.