अली असगरच्या वाढदिवशी सनी देओलने केली मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 21:27 IST2016-12-07T21:27:57+5:302016-12-07T21:27:57+5:30
‘द कपिल शर्मा शो’मधील महत्त्वाचे पात्र असलेला अली असगर म्हणजे ‘दादी’ हा या शोचा महत्त्वाचा भाग आहे. अलीचा वाढदिवस ...

अली असगरच्या वाढदिवशी सनी देओलने केली मस्ती
‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक सेलिब्रेटी हजेरी लावत असतात विशेष म्हणजे या कार्यक्रमात पात्रांचे वाढदिवस किंवा सहभागी सेलिब्रेटींचे वाढदिवस साजरे केले जातात. शोच्या एका भागासाठी अभिनेता सनी देओल, बॉबी देओल व श्रेअस तळपदे यांनी हजेरी लावली होती. त्यांनी देखील अलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व केक कापला. सनी देओल व बॉबी देओल त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. श्रेयस तळपदे निर्मित मराठी चित्रपट ‘पोश्टर बॉईज’चे हिंदी रुपांतरण आहे. या चित्रपटाला श्रेयसच्या नेतृत्वात तयार करण्यात येत आहे.
अलीचा वाढदिवसला आलेल्या खास पाहुण्यामुळे तो आनखीच आनंदी झाला. त्याने सनी व बॉबीच्या उपस्थितीत केक कापला. सर्वांनी चांगलीच मस्ती केली. सनीने मस्ती करताना अख्खा केक अलीच्या चेहºयावर लावला. सामान्यत: सनी शांत व संयमी अभिनेता मानला जातो मात्र, त्याने देखील अलीच्या वाढदिवसाची चांगलीच मजा लुटली.
‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर अलीचा वाढदिवस त्याच्यासाठी एवढा खास ठरणार याची शक्यता अलीला नसल्याने तो देखील सनी व कपिलच्या मस्तीमुळे आश्चर्यचकित झाला असेल यात शंकाच नाही. लवकरच हा वाढदिवस प्रेक्षक टीव्हीवर पाहू शकतील तेव्हा आणखीच जास्त आनंद मिळेल यात शंकाच नाही