सवत माझी लाडकी म्हणत अक्षया देवधरने शेअर केला पती हार्दिक जोशीचा 'त्या' तरुणीसोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:57 PM2023-05-08T16:57:49+5:302023-05-08T16:58:23+5:30

Akshaya Deodhar : अक्षया देवधरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

Akshaya Deodhar shared husband Hardik Joshi's photo with 'that' young lady, saying 'Savat Majhi Ladki' | सवत माझी लाडकी म्हणत अक्षया देवधरने शेअर केला पती हार्दिक जोशीचा 'त्या' तरुणीसोबतचा फोटो

सवत माझी लाडकी म्हणत अक्षया देवधरने शेअर केला पती हार्दिक जोशीचा 'त्या' तरुणीसोबतचा फोटो

googlenewsNext

तुझ्यात जीव रंगला म्हणत अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) या जोडी विवाहबंधनात अडकले. संसारातल्या गमतीजमती, कामाचा व्याप अशा सर्व गोष्टी अक्षया देवधर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच शेअर करत असते. नुकताच अक्षयाने तिच्या इन्स्टग्राम स्टोरीवरून एक खास फोटो शेअर केला आहे. ‘सवत माझी लाडकी’ असे हॅशटॅग देत तिने हार्दिक सोबत असलेल्या एका मैत्रिणीचा फोटो शेअर करून त्यांच्यातील बॉंडिंग कसे आहे याचा खुलासा केला आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

अक्षयाची ही सवत नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न बहुतेकांना पडला असल्याच्या तिला प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तिची ही सवत म्हणजेच अभिनेत्री मुक्ता लेले. मुक्ता लेले ही उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने काही चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. अक्षया आणि मुक्ता या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अभिनयाची आवड या दोघीना नाटक कंपनीत घेऊन आली. इथे या दोघींची मैत्री अधिक घट्ट होत गेली. अक्षयाच्या लग्नानंतरही यांची मैत्री अशीच अबाधित राहिलेली पहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या कित्येकदा भेटीगाठी होत राहतात. 
नुकतीच अक्षया आणि हार्दिकसोबत मुक्ताची भेट घडून आली. यावेळी तिचे हार्दिक सोबत जे बॉडिंग जुळले ते सवतीपेक्षा कुठेच कमी नव्हते. त्यामुळे सवत माझी लाडकी असे कॅप्शन देत अक्षयाने हार्दिक सोबत मुक्ताचा मजामस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर आता तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप दिवसांनी भेटूनही आपण एकमेकांना असेच एक्सप्रेशन देऊ शकतो’ असे मुक्ताने या फोटोवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे एकत्र गेल्या काही दिवसांपासून कुठल्याच प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. पण हार्दिक सध्या वीर दौडले सात या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे बऱ्याचदा तो घराबाहेरच असतो. पण आता लवकरच ही जोडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटनिमित्त हे दोघेही लग्नाअगोदर लंडनला गेले होते. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून लवकरच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Akshaya Deodhar shared husband Hardik Joshi's photo with 'that' young lady, saying 'Savat Majhi Ladki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.