​अक्षय डोगरा या कारणामुळे परतणार वारिस या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 13:05 IST2017-10-19T07:35:46+5:302017-10-19T13:05:46+5:30

वारिस या मालिकेत प्रेक्षकांना अक्षय डोगरा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ...

Akshay Dogra returns to this series due to this heir | ​अक्षय डोगरा या कारणामुळे परतणार वारिस या मालिकेत

​अक्षय डोगरा या कारणामुळे परतणार वारिस या मालिकेत

रिस या मालिकेत प्रेक्षकांना अक्षय डोगरा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तो विविध प्रयोग करत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेच्या एका दृश्यात तर तो आपल्याला शर्टलेस दिसला होता आणि या दृश्याची चांगलीच चर्चा झाली होती. याविषयी अक्षय म्हणाला होता की, आजकाल टिव्ही या माध्यमाचा लोकांवर अधिक परिणाम होत आहे. तुमची शरीरयष्ठी पिळदार असलीच पाहिजे ही गोष्ट आपण सतत मालिकांत, चित्रपटांमध्ये दाखवून आपण तरुणांवर शरीरयष्ठी पिळदार बनवण्यासाठी दबाव टाकत आहोत असे मला वाटते. मी जसा दिसतो, माझी शरीरयष्ठी ज्याप्रकारची आहे त्याबाबत मी प्रचंड खूश आहे. त्यामुळेच माझे शरीर पिळदार नसतानाही मी दृश्यात शर्ट न घालण्याचा निर्णय घेतला."
वारिस या मालिकेमुळे अक्षयला खूप लोकप्रियता मिळाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून तो प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत नाहीये. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या जगन पवानिया आणि त्याच्या बिनधास्त वागण्याला मिस करत आहेत. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो या मालिकेत परतणार आहे. अक्षय जवळजवळ महिन्याभरानंतर प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षयने नुकतेच या मालिकेसाठी पुन्हा चित्रीकरण केले आहे. 
अक्षयची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते. त्याच्या जाण्याने मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे या मालिकेच्या टीमने त्याला परत आणण्याचे ठरवले आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ नुकताच पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अक्षयने पुन्हा चित्रीकरणास सुरुवात केली असल्याचे आपल्याला कळत आहे. 
अक्षय इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेमुळे नावारूपाला आला होता. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी अक्षय लेखक होता. अक्षय हा एक खूप चांगला लेखक असून त्याने अनेक पुस्तकेदेखील लिहिली आहेत. एवढेच नव्हे तर एका मालिकेचे त्याने लेखनदेखील केले आहे. सना खान, अपूर्वा अग्निहोत्री यांची प्रमुख भूमिका असलेल्या सौभाग्यलक्ष्मी या मालिकेचे त्याने लेखन केले होते. 

Also Read : ​या अभिनेत्याने मालिकांचे लेखनदेखील केले आहे...

Web Title: Akshay Dogra returns to this series due to this heir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.