​अक्षर कोठारी आणि मानसी नाईकची जोडी झळकणार चाहुल २ या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:03 IST2017-10-10T10:33:38+5:302017-10-10T16:03:38+5:30

अक्षर कोठारी चाहूल २ या मालिकेत सर्जाची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. त्याने ...

Akshar Kothari and Mansi Naik will be seen in the series | ​अक्षर कोठारी आणि मानसी नाईकची जोडी झळकणार चाहुल २ या मालिकेत

​अक्षर कोठारी आणि मानसी नाईकची जोडी झळकणार चाहुल २ या मालिकेत

्षर कोठारी चाहूल २ या मालिकेत सर्जाची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. त्याने चाहूल या मालिकेच्या आधी कलर्स मराठी वाहिनीवरील कमला या मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. चाहूल ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षक त्याच्या भूमिकेच्या प्रेमात पडले आहेत. आता तर अक्षर चाहूल या मालिकेत आपल्याला डबल रोलमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षर त्याच्या दोन्ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारत आहे. 
चाहूल २ या मालिकेत सर्जा सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे आता सर्जाच्या लक्षात आले आहे. या व्यक्तीचे नाव साहेबराव असे असून साहेबराव हा सुरेखाचा नवरा आहे आणि तो वाड्यामधून गायब आहे. अक्षर या साहेबरावच्या लुकमध्ये खूपच वेगळा दिसत आहे. त्याच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे. या लूकमध्ये अक्षर पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा अशा रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चाहूल २ या मालिकेमधील अक्षरचा हा नवा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत अक्षरचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत असल्याने त्याचे फॅन्स सध्या चांगलेच खूश आहेत. त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. अक्षरची पत्नी मानसी नाईक देखील प्रेक्षकांना चाहूल २ या मालिकेत आता पाहायला मिळणार आहे. लवकरच या मालिकेत तिची एंट्री होणार आहे. ती या मालिकेत मंदाकिनी ही भूमिका साकारत  असून ती सर्जेरावची दुसरी पत्नी असल्याचे दाखवले जाणार आहे. 
मानसी आणि अक्षर हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असल्याने त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मानसी आणि अक्षरला एकत्र काम करायला मिळत असल्याने ते दोघे सध्या प्रचंड खूश आहेत. मानसीचा देखील या मालिकेतील लूक खूपच वेगळा असणार आहे.
मानसी आणि अक्षरची ऑफ स्क्रीन जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन देखील आवडेल यात काही शंकाच नाही. 

Also Read : चाहुलच्या सेटवर ​अक्षर कोठारीच्या वाढदिवसाचे दमदार सेलिब्रेशन

Web Title: Akshar Kothari and Mansi Naik will be seen in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.