अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:51 IST2018-03-21T07:21:19+5:302018-03-21T12:51:19+5:30

'लागिरं झालं जी ही' मालिका सुरू होऊन अनेक महिने झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Ajinkya injured during shooting shot Sin | अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

'
;लागिरं झालं जी ही' मालिका सुरू होऊन अनेक महिने झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.या मालिकेतील शीतली आणि अजिंक्य म्हणजेच अज्या हे दोघे तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके बनले आहेत.मालिकेत प्रेक्षकांना अज्या आणि शीतलीची प्रेमकथा पाहायला मिळत आहे.मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा अधिक रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे.

या मालिकेत प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे.याआधी मालिकेत रसिकांनी पाहिले की अजिंक्य शीतलला लग्नाची मागणी घालतो, त्यांच्या नात्या विषयी जेव्हा हर्षवर्धनला कळते तेव्हा गोष्टी वेगळ्याच थराला जाऊन पोचतात.हर्षवर्धनचे शीतलवरील एकतर्फी प्रेम असल्यामुळे जेव्हा त्याला शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि अजिंक्यला तो मारण्यासाठी गुंड पाठवतो.भारतीय सेनेत भरती झालेला आपला अजिंक्य ह्या सगळ्याला
कसा समोर जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ह्यातून अजिंक्य आणि शीतलच्या प्रेमाला वेगळी कलाटणी मिळणार का? यासाठी तुम्हाला पाहावा लागणार आहे ‘लागिर झालं जी’ चा हा भाग.  रसिक अजिंक्यला या गुंडांशी दोन हात करताना पाहू शकणार आहेत. मार्शल आर्टमध्ये एक्स्पर्टस असलेल्या विकास आणि राकेश या फाईट मास्टर्सच्या देखरेखीखाली हा फाइट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आला आहे. आणि त्यांनी अजिंक्याला या सिक्वेन्ससाठी योग्य प्रशिक्षण दिले आहे. फाईट सिक्वेन्स शूट करताना अजिंक्यला अनेक ठिकाणी खरचटले होते पण तरीही त्याने दुखापतीकडे लक्ष न देता मोठ्या जिद्दीने पहाटे ४ वाजे पर्यंत फाईट सिक्वेन्सचे चित्रीकरण पूर्ण केले.

मालिकेत अजिंक्यप्रमाणे शीतली भूमिका साकारणारी शिवानी बावकर ही खूप लोकप्रिय बनली आहे.तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते.शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे.शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. 



Web Title: Ajinkya injured during shooting shot Sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.