अजय-अतुलला चढली ‘झिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 10:05 IST2016-03-16T16:53:36+5:302016-03-16T10:05:50+5:30
आता तुम्ही म्हणाल, ‘अजय-अतुल इतके प्रतिष्ठित संगीतकार आणि त्यांना कसली झिंग चढली बरं?’ तर ही झिंग त्यांच्या आगामी ‘सैराट’ ...
.jpg)
अजय-अतुलला चढली ‘झिंग’
आ ा तुम्ही म्हणाल, ‘अजय-अतुल इतके प्रतिष्ठित संगीतकार आणि त्यांना कसली झिंग चढली बरं?’ तर ही झिंग त्यांच्या आगामी ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्याची आहे.
नुकत्याच मुंबईत झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांनी हे गाणे प्रदर्शित केले. अजय-अतुल नेहमीच अवॉर्ड सोहळा असो किंवा इतर कोणता कार्यक्रम, एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने एन्ट्री करून प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. याही वेळेस अजयने जीपमधून तर अतुलने स्पोर्ट्स बाइकने स्टेजवर एन्ट्री केली आणि उपस्थितांच्या टाळ्या व शिट्ट्या मिळवल्या.
अजय गोगावले यांनीच ‘झिंगाट’ हे गीत लिहिले आहे. ‘मोरया’, ‘माउली माउली’, ‘आई भवानी’, ‘आला होळीचा सण’, ‘बायगो’, ‘चिंब भिजलेले’ या हिट गाण्यांनंतर ‘झिंगाट’ या उडत्या चालीच्या गाण्याने अल्पावधीतच सोशल नेटवर्किंगवर लाखो लाइक्स मिळवले आहेत.