अहमद खान 'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर' शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 11:56 IST2018-02-06T06:26:28+5:302018-02-06T11:56:28+5:30
छोट्या पडद्यावरील पहिल्यांदाच एक अभूतपूर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. &TV वर 'हाय फिव्हर डान्स का नया तेवर' हा टेलिव्हिजनवरील ...
अहमद खान 'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर' शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार
छ ट्या पडद्यावरील पहिल्यांदाच एक अभूतपूर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. &TV वर 'हाय फिव्हर डान्स का नया तेवर' हा टेलिव्हिजनवरील एक अभूतपूर्व डान्स रिअॅलिटी शो सुरू होणार आहे.या शोमध्ये देशभरातील उदयोन्मुख डान्सिंग जोड्यांचा समावेश असेल. या जोड्या नृत्य आव्हाने स्वीकारण्यासोबतच त्यांच्या नात्यामधील दृढतेची परीक्षा देतील. विविध वयोगटातील जोड्यांमधील कौशल्य व भावनिक संबंधांची चाचणी घेणा-या 'हाय फिवर' शोमध्ये आई-मुलगी,वडिल-मुलगा, पती-पत्नी, गुरू-शिष्य अशा अपारंपारिक नाते असलेल्या जोड्यांचा समावेश असणार आहे.या सर्वांमध्ये नृत्य हीच समान बाब आहे. या डान्सिंग जोड्यांमधील अद्वितीय कौशल्यासोबत त्यांच्यामधील दृढ संबंध मंचावर धमाल निर्माण करतील आणि प्रेक्षकांना अतुलनतीय मनोरंजनचा आनंद देतील.स्पर्धकांच्या या नृत्य प्रवासामध्ये त्यांना मार्गदर्शन करणार आहे लोकप्रिय बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक, निर्माता,अभिनेता,दिग्दर्शक व लेखक अहमद खान. अहमद खान शोच्या परीक्षकाची धुरा सांभाळणार आहे.
सलमान खान अभिनीत 'किक', सैफ अली खान अभिनीत 'फॅन्टम' अशा चित्रपटांमधील साहसी कृत्ये आणि 'एअरलिफ्ट' आणि 'राबता' या चित्रपटांमधील लोकप्रिय गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी लोकप्रिय असलेल्या अहमद खानने काही सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शनासह जगभरात आपले नाव स्थापित केले आहे. खरेतर, या नृत्यदिग्दर्शकाने 'पाठशाला' सारख्या चित्रपटांमधून आपले दिग्दर्शन कौशल्य सुद्धा दाखवले आहे आणि लवकरच त्याने दिग्दर्शित केलेला 'बागी २' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही क्षेत्रातील आपले कसब एकत्र आणत अहमद खान शोचा कुशल परीक्षक म्हणून भूमिका पार पाडेल आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करेल,त्यांना कंटेम्परी नृत्य करणा-या स्पर्धकांपेक्षा आपला परफॉर्मन्स कशाप्रकारे उत्तम होईल याबाबत टिप्स देईल.या शोचा भाग असण्याबाबत बोलताना अहमद खान म्हणाला, ''डान्स ही माझी आवड आहे आणि मी शोमधील समविचारी व्यक्तींना भेटण्यास खूपच उत्सुक आहे. 'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर' या शोबाबत मला आवडलेली बाब म्हणजे हा फक्त एक डान्स शो नाही. जोड्यांमधील डान्सचा विचार केला तर नृत्य कौशल्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींचा देखील विचार करावा लागतो. त्यांच्यामधील केमिस्ट्री, एकमेकांमधील सहचर व कम्फर्ट हे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. मी शानदार व्हिज्युअल निर्माण करणा-या नृत्यांनुसार स्पर्धकांचे परीक्षण करणार आहे. मी सर्वोत्तम नृत्य सादर करणा-या रोमांचक जोड्यांची अपेक्षा करत आहे.''