​आतिश कापडियाचा मुलगा अगस्त्य आणि जे. डी. मजेठिया यांची मुलगी मिश्री यांचे ‘खिचडी’द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 10:01 AM2018-04-02T10:01:19+5:302018-04-02T15:31:19+5:30

विनोदाची नवी दृष्टी असलेले जे. डी. मजेठिया आणि खुमासदार लेखन करणारे आतिश कापडिया यांनी आपल्या नर्म विनोदी मालिकेद्वारे टीव्हीच्या ...

Agastya, son of Ashish Kapadiya and J. D. Meethethiya's daughter debut on small screen through 'Khichdi' of Ms. | ​आतिश कापडियाचा मुलगा अगस्त्य आणि जे. डी. मजेठिया यांची मुलगी मिश्री यांचे ‘खिचडी’द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण

​आतिश कापडियाचा मुलगा अगस्त्य आणि जे. डी. मजेठिया यांची मुलगी मिश्री यांचे ‘खिचडी’द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण

googlenewsNext
नोदाची नवी दृष्टी असलेले जे. डी. मजेठिया आणि खुमासदार लेखन करणारे आतिश कापडिया यांनी आपल्या नर्म विनोदी मालिकेद्वारे टीव्हीच्या पडद्यावरील विनोदाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आता ही गुणी कलाकारांची जोडी त्यांच्या एका विलक्षण लोकप्रिय मालिकेला पुन्हा छोट्या पडद्यावर सादर करणार आहे. हो, आम्ही ‘स्टार प्लस’वरील ‘खिचडी’ या मालिकेबद्दलच बोलत आहोत. नव्या स्वरूपातील ‘खिचडी’मध्ये अनंग देसाई, सुप्रिया पाठक, राजीव मेहता, वंदना पाठक, स्वत: जे. डी. मजेठिया हे खिचडी या मूळ मालिकेतील कलाकार आपल्या भूमिकांमध्ये दिसतीलच. पण त्याचसोबत रेणुका शहाणे, दीपशिखा नागपाल आणि बख्तियार इराणी हे नामवंत कलाकारही या मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रत्येक भागात एक प्रसिद्ध कलाकार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
खिचडी या मालिकेत चक्की आणि जॅकी या व्यक्तिरेखा अनुक्रमे रिचा भद्रा आणि यश मित्तल यांनी साकारल्या होत्या. पण आता या मालिकेत नवे कलाकार चक्की आणि जॅकी या भूमिकेत दिसणार आहेत. खिचडी या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना हे बालकलाकार पाहायला देखील मिळत आहेत. खिचडीचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून हे कलाकार कोण आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. हे कलाकार खिचडी या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी संबंधित आहेत. आतिश कापडियाचा मुलगा अगस्त्य आणि जे.डी.मजेठिया यांची धाकटी मुलगी मिश्री हे दोघे या मालिकेत चक्की आणि जॅकीची भूमिका साकारत आहेत. या मालिकेद्वारे ते दोघे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत.
खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

Also Read : वंदना पाठकचे खरे वडील बनले सुप्रिया पाठकचे पडद्यावरील वडील!

Web Title: Agastya, son of Ashish Kapadiya and J. D. Meethethiya's daughter debut on small screen through 'Khichdi' of Ms.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.