विरुष्का पाठोपाठ या अभिनेत्रींही केले गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:45 IST2017-12-27T11:15:40+5:302017-12-27T16:45:40+5:30

अनुष्का आणि विराटने जसे गुपचूप लग्न केले त्या यादीत आणखीन एक नवा सामिल झाले आहे. एकीकडे विरुष्काच्या लग्नाची चर्चा होत असतानाच बॉलिवूडमधल्या आणखीन एका हॉट अभिनेत्री सोशल मीडियावर लग्न केल्याची बातमी दिली आहे.

After this Viru, the actress also secretly got married | विरुष्का पाठोपाठ या अभिनेत्रींही केले गुपचूप लग्न

विरुष्का पाठोपाठ या अभिनेत्रींही केले गुपचूप लग्न

ुष्का आणि विराटने जसे गुपचूप लग्न केले त्या यादीत आणखीन एक नवा सामिल झाले आहे. एकीकडे विरुष्काच्या लग्नाची चर्चा होत असतानाच बॉलिवूडमधल्या आणखीन एका हॉट अभिनेत्री सोशल मीडियावर लग्न केल्याची बातमी दिली आहे. सुरवीन चावला असे या अभिनेत्रीचे नाव आहे. सुरवीनने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे.   
हेट स्टोरी 2 मध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन सुरवीन  चांगलीच चर्चेत आली होती. सुरवीनने अनेक टीव्ही सिरीअलमध्ये सुद्धा काम केले आहे.  सुरवीनने नवऱ्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सुरवीनने म्हटले आहे की, अशाप्रकारे एका सर्वसामान्य आयुष्यात प्रेमाने आम्हाला परिकथेची कथा दिली.  यात  तिने रेड कलरचा गाऊन घातल नवरा अक्षय सोबत पोझ दिली आहे.  

सुरवीनने आपल्या लग्नाची बातमी आज सोशल मीडियावर दिली. इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार सुरवीनने 2 वर्षापूर्वी अक्षयसोबत इटलीमध्ये 28 जुलै 2015 ला लग्न केले आहे. मात्र प्रेक्षकांना सांगायला योग्य वेळेची वाट बघते होती. अक्षय आणि सुरवीनची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या थ्रू झाली होती.लग्नाच्या वेळी काही कुटुंबीय आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित होता. सुरवीनची इच्छा होती की तिचे लग्न  कॅसलच्या बाजूला व्हावे. त्यामुळे तिच्या इच्छेनुसार दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. अक्षय ठक्कर हा व्यावसायिक आहे. 
सुरवीन सध्या एकता कपूरची वेब सिरीज हक से च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात तिच्यासोबत राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुरवीनने अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. मात्र हेट स्टोरी 2 मुळे ती चर्चेत आली. याशिवाय ती कसोटी जिंदगी की, कॉमेडी सर्कस आणि 24 सीझनमध्ये दिसली होती.  

सुरवीन प्रमाणे अभिनेत्री इलियाना डिक्रुझनेही सोशल मीडियावरुन लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. 

Web Title: After this Viru, the actress also secretly got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.