सायली कांबळेनंतर Indian Idol 12मधील हा स्पर्धक लवकरच चढणार बोहल्यावर, पार पडला हळदी-मेहंदी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:02 IST2023-04-28T16:01:22+5:302023-04-28T16:02:07+5:30
Indian Idol 12 : 'इंडियन आयडॉल' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. या शोचा १२ वा सीजन खूप गाजला होता.

सायली कांबळेनंतर Indian Idol 12मधील हा स्पर्धक लवकरच चढणार बोहल्यावर, पार पडला हळदी-मेहंदी सोहळा
हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल'(Indian Idol 12)ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या शोमधून देशाला खूप चांगले सिंगर मिळाले आहेत. या शोचा १२ वा सीजन खूप गाजला होता. 'इंडियन आयडॉल १२'मध्ये पवनदीप राजन, सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, अरुणिता कांजीलाल,सवाई भट्ट, नचिकेत लेले,अंजली गायकवाड, आणि मोहम्मद दानिश असे एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते.
इंडियन आयडॉल १२ मधील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि फायनल पर्यंत पोहोचलेल्या काही मोजक्या स्पर्धकांमध्ये मोहम्मद दानिशचा समावेश होतो. दानिशचा मोठा चाहतावर्ग आहे. गायकाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. दानिश लग्नबेडीत अडकणार आहे. त्याच्या हळदी आणि मेहंदीचे कार्यक्रम नुकताच पार पडला.
दानिशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या प्री वेडिंग कार्यक्रमांचे फोटो शेअर केले आहेत. मोहम्मद दानिश कोणासोबत लग्न करत आहे? किंवा त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर चाहते मोहम्मद दानिशवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.