माधुरी दीक्षितनंतर आता श्रीदेवी म्हणणार झलक दिखला जा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:42 IST2017-07-31T06:02:42+5:302017-07-31T11:42:14+5:30
झलक दिखला जा च्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच झलकचा 10वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीजनमध्ये जजच्या ...
.jpg)
माधुरी दीक्षितनंतर आता श्रीदेवी म्हणणार झलक दिखला जा...
झ क दिखला जा च्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच झलकचा 10वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीजनमध्ये जजच्या खुर्चीवर चक्क श्रीदेवी बसणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलात झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती जज म्हणून येणार आहे. ऐवढेच नाही तर श्रीदेवीसोबत बॉलिवूडमधील आणखीन दोन दिग्गज डान्सर जज म्हणून तिच्यासोबत असणार आहेत. मलायका अरोरा आणि गोविंदा हे दोघेदेखील श्रीदेवीसोबत जज च्या खुर्चीवर बसलेले दिसणार आहेत.
याआधी या शोला माधुरी दीक्षित. जॅकलिन फर्नांडिस, जुही चावला, शाहिद कपूर यांनी जज केले आहे. श्रीदेवी, गोविंदा आणि मलायका अरोरा ही तीन नाव जर परीक्षकाच्या भूमिकेसाठी फायनल होणार असतील तर शो ची टीआरपी ही रेकॉर्ड तोड असेल यात काही शंका नाही. नोव्हेंबरपर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचा 11वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खान करणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानही छोट्या पडद्यावर टेड टॉक : नयी सोच हा टॉक शो घेऊन येतो आहे. त्यामुळे शाहरुख आणि सलमान हे एकमेकांच्या समोर येणार आहेत. 19 ऑगस्टला शाहरुख आपल्या नव्या शोचे प्रोमो शूट करणार आहे. याआधी ही शाहरुखने पाचवी पाससे तेज आणि कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन केले होते. शारुखचा शो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच काय तर छोट्या पडदा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.