​बेहदनंतर आता या मालिकेत दिसणार कुशल टंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:52 IST2017-11-02T09:22:12+5:302017-11-02T14:52:12+5:30

एक हजारों में मेरी बहना है या मालिकेपासून कुशल टंडनच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नच बलिये, बिग बॉस, खतरों के ...

After a long time, the tandan will appear in this series | ​बेहदनंतर आता या मालिकेत दिसणार कुशल टंडन

​बेहदनंतर आता या मालिकेत दिसणार कुशल टंडन

हजारों में मेरी बहना है या मालिकेपासून कुशल टंडनच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नच बलिये, बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील त्याने काम केले आहे. बिग बॉसमध्ये असताना गौहर खान आणि त्याची प्रेमकथा चांगलीच गाजली होती. तो नुकताच बेहद या मालिकेत झळकला होता. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेत कुशलने अर्जुनची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.  ही मालिका संपल्यानंतर कुशलला अनेक मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. कुशलने आपल्या मालिकेचा भाग असावे असे अनेक निर्मात्यांना वाटत असले तरी कोणत्या मालिकेचा भाग व्हायचे हे अद्याप करी कुशलने ठरवलेले नाहीये. 
कुशल टंडनला बालाजी टेलिफ्लिम्सची सर्वेसर्वा एकता कपूरने देखील मालिकेची ऑफर दिली असल्याचे म्हटले जात आहे. एकताच्या मालिका सध्या छोट्या पडद्याप्रमाणेच इंटरनेटवर देखील धुमाकूळ घालत आहेत. तिच्या अल्ट बालाजीने आजवर अनेक हिट मालिका दिल्या आहेत. या अल्ट बालाजीवर आणखी एक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेत कुशल प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचे नाव कपूर असणार असून ही एक फॅमिली ड्रामा असल्याची चर्चा आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी कुशलला साइन केले असून इतर भूमिका कोणते कलाकार साकारणार याचा सध्या विचार सुरू आहे. ही मालिका दिल धडकने दो या चित्रपटासारखी असणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल धडकने दो प्रमाणेच ही मालिका एका कुटुंबावर आधारित असून त्यांच्यातील नातेसंबंध प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. 
अल्ट बालाजीच्या आजवरच्या अनेक मालिकांमध्ये रोनित रॉय, मोना सिंग, साक्षी तन्वर, राजीव खंडेलवाल, सुरवीन चावला, राम कपूर यांसारखे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता कुशल कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

Also Read : कुशल टंडन पडला अनेरी वजानीच्या प्रेमात?

Web Title: After a long time, the tandan will appear in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.