तब्बल 10 वर्षानंतर तन्वी आझमी झळकणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 15:39 IST2017-05-22T10:09:05+5:302017-05-22T15:39:05+5:30
सध्या टीव्हीवर नवीन मालिका सुरू होत आहेत. त्यानुसार अनेक वर्ष टीव्ही मालिकांपासून दूर असलेले कलाकार आता टीव्ही मालिकांकडे वळताना ...
.jpg)
तब्बल 10 वर्षानंतर तन्वी आझमी झळकणार या मालिकेत
ध्या टीव्हीवर नवीन मालिका सुरू होत आहेत. त्यानुसार अनेक वर्ष टीव्ही मालिकांपासून दूर असलेले कलाकार आता टीव्ही मालिकांकडे वळताना दिसतायेत.ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आझमी तब्बल 10 वर्षानंतर छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत.वानी राणी या मालिकेत त्या डबल रोल साकारणार आहेत. वानी राणी ही मालिका लोकप्रिय तामिळ मालिकेचे हिंदी व्हर्जन असणार आहे.याविषयी तन्वी आझमी यांनी सांगितले की,इतक्या मोठ्या ब्रेकनंतर टीव्हीवर परतणे हे तशी आव्हानात्मक आहे. कारण 10 वर्षात टीव्ही पूर्णपणे बदलला आहे.नवनवीन प्रयोग टीव्ही इंडस्ट्रीत होत आहेत.कामाच्या पध्दतीही बदलल्या आहेत.पूर्वीनुसारखे काही नसले तरी नव नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यामुळे खूप उत्सुक आहे.'वानी रानी' ही दोन जुळ्या बहिणींची कथा आहे.या बहिणींची लग्नही एकाच घरात झाली आहेत.दोन्ही बहिणी असूनही स्वभावामुळे दोघींचे एकमेकांशी पटत नाहीत. अशी या मालिकेची कथा आहे.आता रसिकांना माझी भूमिका कितपत पसंत पडते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.तन्वी आझमी यांनी अनेक सिनेमांत काम केले आहे.यापूर्वी तन्वी यांनी 'सिंदुर तेरे नाम का' या मालिकेत काम केेल होते, मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेचेही विशेष कौतुक करण्यात आले होते. त्या आधी त्यांनी फॅमिली नंबर 1,जमीन आसमाँ,लाइफ लाईन,लोहित किनारे,मिर्झा गालिब,या मालिकेत तन्वी आझमी झळकल्या होत्या. 2007नंतर त्यांनी मालिकापासून ब्रेक घेत फक्त सिनेमातच रमल्या. दरम्यानच्या काळात सिनेमात बिझी असल्यामुळे मालिकांना वेळ देणे जमत नसल्याने फक्त सिनेमावर फोकस त्यांनी केला.2015मध्ये आलेला 'बाजीराव मस्तानी' सिनेमात त्यांनी राधाबाईही भूमिका साकारली होती.