n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">सुहानी सी एक लडकी या मालिकेत सुहानीची भूमिका साकारणारी राजश्री राणी पांडेला नुकतेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या हदयाचे ठोके अचानक अतिशय कमी झाले असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रक्तदाब खूपच कमी असल्याने तिला आयसीयुमध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता ती उपचाराला प्रतिसाद देत असून तिचा रक्तदाब नियंत्रणात अाला आहे. सध्या तिला आयसीयुमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.