आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 17:30 IST2024-06-28T17:30:00+5:302024-06-28T17:30:00+5:30
Aditi Dravid: आजीच्या चेहऱ्यावर डान्स करण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. उत्तम अभिनयासह प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या आदितीचं नुकतंच एक गाण प्रदर्शित झालं. सावनी रविंद्रच्या आवाज स्वरबद्ध झालेलं आदितीचं मन पाखरावानी हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होतंय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील शेअर केले आहेत.
अदितीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क तिच्या ९० वर्षाच्या आजीने या गाण्यावर ताल धरला आहे. आदिती आणि तिच्या आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजीने केलेला डान्स, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
दरम्यान, "आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद is when your Family is proud of your work!🥹 Aajibaai loved the song and wanted to dance with me! खरंच,कसं जमतं हिला??", असं कॅप्शन देत आदितीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आदिती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिका, म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे.