n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">शोले या चित्रपटातला होली कब है हा गब्बरचा संवाद आजही प्रेक्षकांच्या तितक्याच स्मरणात आहे. होळी जवळ आली की, सोशल मीडियावर होली कब है या संबंधित जोक्सही आपल्याला वाचायला मिळतात. आता एका ऑनलाईन कंपनीच्या जाहिरातीत अभिनेता आदिनाथ कोठारे दिवाली कब है हा प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जाहिरातीबद्दल आदिनाथ सांगतो, मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण जाहिरातीत काम करण्याची मजा काही वेगळीच असते. मी आतापर्यंत चार जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यातील एक जाहिरात तर दाक्षिणात्य भाषेत होती. केवळ काही क्षणांसाठी संपूर्ण टीम इतकी मेहनत घेते ही गोष्ट मला खूपच आवडते. ही जाहिरात प्रसारित झाल्यापासून मला खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.