'ती परत आलीये' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:57 PM2021-08-11T13:57:57+5:302021-08-11T13:58:47+5:30

'ती परत आलीये' या मालिकेत विजय कदम यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.

The actress who will appear in the series 'Ti Parat Aaliye', find out about her | 'ती परत आलीये' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

'ती परत आलीये' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवर येत्या १६ ऑगस्ट पासून देवमाणूस या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ती परत आलीये या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला अभिनेते विजय कदम यांची झलक पाहायला मिळाली मात्र इतर कलाकारांबद्दल अद्यापही मालिकेने खुलासा केला नाही. मात्र मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार आहेत हे नुकतेच समोर आले आहेत. 

ती परत आलीये या मालिकेत विजय कदम यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत, त्यात अभिनेत्री कुंजीका काळवींट हिचे नाव नुकतेच समोर येत आहे.

‘एक निर्णय’ या चित्रपटातून कुंजीकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. कुंजीकाने ‘स्वामीनी’ या लोकप्रिय मालिकेत तिने आनंदीबाईची भूमिका साकारली होती. ही विरोधी भूमिका असल्याने कुंजीकाला प्रेक्षकांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने प्रियाची भूमिका साकारली होती.


एक निर्णय या चित्रपटात आणि चंद्र आहे साक्षीला या मालिकेत तिने सुबोध भावे सोबत काम केले. अभिनेत्री कुंजीका काळवींट आता झी मराठी वरील ‘ती परत आलीये’ मालिकेत प्रमुख भूमिका बजावणार आहे.

कुंजीकासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती. याअगोदर ‘भेटी लागी जिवा’ ही सोनी मराठीवरील मालिका आणि ‘जिगरबाज’ मालिका त्याने काम केले होते. 

Web Title: The actress who will appear in the series 'Ti Parat Aaliye', find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.