मृत अभिनेत्री वीणा कपूर पोलीस स्टेशनला पोहचली; जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांची भंबेरी उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:23 AM2022-12-15T11:23:17+5:302022-12-15T11:48:52+5:30

सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

Actress Veena kapoor reaches police station lodges complaint against her death news rumor | मृत अभिनेत्री वीणा कपूर पोलीस स्टेशनला पोहचली; जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांची भंबेरी उडाली

मृत अभिनेत्री वीणा कपूर पोलीस स्टेशनला पोहचली; जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांची भंबेरी उडाली

googlenewsNext

अभिनय जगतातून टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांंच्या त्यांच्या मुलाने हत्या केल्याची धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. प्रॉपर्टीसाठी अभिनेत्रीच्या मुलाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता 'मृत' अभिनेत्री वीणा कपूरने मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपण जिवंत असल्याचं सांगितलं  आहे.

पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार 
ही गोष्ट थोडी विचित्र की मृत अभिनेत्री तक्रार कशी करू शकते, पण हे खरं आहे. ही हत्या टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांची नसून, मुंबईच्या जुहू भागात रहाणाऱ्या वीणा कपूर या महिलेची झाली असून तिचा मुलगा सचिन कपूरने ही हत्या केली होती. दोघींचं नाव सारखं असल्याने हा घोळ झाला. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांच्या मुलालाही ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्री वीणा कपूरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी लोकांविरोधात तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आपण जिवंत असल्याची तक्रार अभिनेत्री वीणा कपूरने पोलिसांकडे केली असून तिच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यांच्या मृत्यूच्या अफवेनं अभिनेत्री व्यथित झाल्या, त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

अफवांमुळे झाले हैराण
अभिनेत्री वीणा कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मी अस्वस्थ आहे. माझा फोटो व्हायरल झाला असून लोक मला श्रद्धांजली वाहत आहेत. मला लोकांचे फोन येत आहेत आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मला सर्वांना सांगायचे आहे की माझ्या मुलाने मला मारले नाही. माझ्या मृत्यूची चुकीची बातमी पसरवली गेली. या खोट्या अफवेमुळे मला काम मिळणेही बंद झाले आहे. 


 

Web Title: Actress Veena kapoor reaches police station lodges complaint against her death news rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.