या अभिनेत्रीने घेतली तब्बूकडून प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:09 IST2016-10-27T14:45:22+5:302016-10-27T16:09:47+5:30
तब्बू ही बॉलिवूडमधील एक सशक्त अभिनेत्री मानली जाते. तिने आजपर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज ...

या अभिनेत्रीने घेतली तब्बूकडून प्रेरणा
त ्बू ही बॉलिवूडमधील एक सशक्त अभिनेत्री मानली जाते. तिने आजपर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज अनेक नव्या अभिनेत्री तिच्या अभिनयातून प्रेरणा घेत आहेत. दलजीत कौर काल टीका या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील एका दृश्याविषयी सांगताच तिला हवा या चित्रपटातील तब्बूचे एक दृश्य आठवले असे ती सांगते. पुढील काही भागांमध्ये देवरी म्हणजेच विनीत राणाची मंजिरीवर वाईट नजर असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो अदृश्य होऊन मंजिरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे दृश्य चित्रीत करण्याआधी दलजितने हवा या चित्रपटातील दृश्य अनेकवेळा पाहिले. ती सांगते, "या दृश्याचे चित्रीकरण करणे खूपच कठीण होते. खरे तर मी खूपच नर्व्हस होते. पण माझ्या संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिले. या दृश्याच्या चित्रीकरणाच्यावेळी केवळ 3-4 जणच या सेटवर उपस्थित होते. या दृश्याचे चित्रीकरण करत असताना मी हवा या चित्रपटातील दृश्याची मदत घेतली. तब्बूने या दृश्यात अतिशय सुंदर अभिनय केला आहे. तिच्यामुळेच मला हे दृश्य अतिशय चांगल्याप्रकारे साकारता आले. देवरी काळ्या जादूने एका अदृश्य दानवाची निर्मिती करणार असून तो दानव मंजिरी झोपलेली असताना तिची मानसिक आणि शाररिक छळ करणार आहे. देवरी त्याच्या वाईट शक्तीचा वापर करून मंजिरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार आहे असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या दृश्यातील माझा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे."