मराठमोळी तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राचं ठरलं? लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:11 IST2025-11-15T11:08:29+5:302025-11-15T11:11:34+5:30
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात अडकणार? अखेर अभिनेत्री सांगूनच टाकलं, म्हणाली...

मराठमोळी तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राचं ठरलं? लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर; म्हणाली...
Tejasswi Prakash And Karan Kundra Wedding: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. बिग बॉस १५ च्या सीझनमध्ये त्यांचे सूर जुळले आणि त्यानंतर दोघांनी आपलं नातं जगजाहीर केलं.तिथून त्यांची प्रेमकहाणीला सुरुवात झाली आणि त्यांचं प्रेम आजही टिकून आहे.करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. या जोडीवर चाहते अगदी भरभरुन प्रेम करतात.मात्र, ही जोडी खऱ्या आयुष्यात कधी एकत्र येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. यावर आता स्वत: तेजस्वीने उत्तर दिलं आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात येतं.त्यामुळे चाहत्यांची ही लाडकी जोडी कधी लग्न करणार याविषयी जाणून घेण्यास सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात आता ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं समजतंय.नुकतीच तेजस्विने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तिने म्हटलं," बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर करणला लग्न करायचं होतं, मात्र यासाठी तिच्या आईचा नकार होता.तिच्या आईने त्यांना काही दिवस एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता. याचं कारण म्हणजे बाहेरच्या दुनियेत एकमेकांना समजून घेण्यासाठी हा पर्याय त्यांना योग्य वाटत होता. यावेळी तेजस्विने असंही सांगितलं की, तिच्या कुटुंबियांनी करणवर कधीच अविश्वास दाखवला नाही. "
मग पुढे तेजस्वी म्हणाली, "सुरुवातीला मलाही असं वाटयचं की कदाचित करणला मी आवडत नसेन. त्याचा फक्त माझ्यावर क्रश आहे.पण, नंतर करणने मला सांगितलं,की आपण लग्न करूयात. परंतु, माझ्या आईचं असं म्हणणं होतं की,तुम्ही दोघं एकत्र वेळ घालवा. एकमेकांना समजून घ्या आणि मग योग्य तो निर्णय घ्या."
लग्नाबद्दल तेजस्वी काय म्हणाली...
लग्नाबद्दल बोलताना तेजस्वी प्रकाश म्हणाली," आमचा लग्नाचा विचार सुरु आहे. कदाचित येत्या २०२६ पर्यंत आम्ही लग्न करु.घरचे सुद्धा याबद्दल बोलत आहेत. पण, बघूयात काय घडतंय." असा खुलासा करत तेजस्विनीने चाहत्यांना लग्नाबद्दल हिंट दिली आहे.