'असावमी' तेजश्री प्रधानची नवी सीरिज, 'या' हँडसम मराठी अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:18 IST2025-11-17T17:17:50+5:302025-11-17T17:18:08+5:30
तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर वेबसीरिजची हिंट दिली होती.

'असावमी' तेजश्री प्रधानची नवी सीरिज, 'या' हँडसम मराठी अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिची आणि सुबोध भावेची जोडी जमली आहे. सध्या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय तेजश्री लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. मराठीतला हँडसम हिरो तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कोण आहे तो?
तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर वेबसीरिजची हिंट दिली होती. 'नवीन प्रोजेक्ट','वेबसीरिज' असं तिने लिहिलं होतं. तर गेल्याच आठवड्यात तेजश्रीने शूटिंग सेटवरुन फोटो पोस्ट केला. तिच्या हातात क्लॅप बोर्ड दिसत आहे. 'असावमी' असं तिच्या या प्रोजेक्टचं नाव आहे. 'दीयाला भेटा'असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं. तसंच लवकरच आणखी माहिती सांगेन असं तिने नमूद केलं.
विशेष म्हणजे तेजश्रीचा हा फोटो काढणारा दुसरा कोणी नसून मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर आहे. याचा अर्थ तेजश्री आणि अभिजीतची जोडी वेबसीरिजमध्ये जमली आहे. आता या सीरिजबद्दलच्या अधिक अपडेट्ससाठी चाहते उत्सुक आहेत.
सध्या तेजश्री मालिकेत व्यग्र असून अभिजीत 'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. याआधी तेजश्री आणि अभिजीत एका जाहिरातीत दिसले होते. भाऊबीज स्पेशल ती जाहिरात होती. त्यातच त्यांची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती.