या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 05:27 PM2021-12-17T17:27:28+5:302021-12-17T17:33:26+5:30

ती सध्या अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारते आहे.

Actress Sukhada khandkekar bikini in home renovation | या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

googlenewsNext

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar). सोशल मीडियावर सुखदा बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. अलीकडेच सुखदाने इन्स्टाग्रामवर तिचा  मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. सुखदा वूडन फ्लोरिंग सिलेक्ट करण्यासाठी दुकानात आलेली दिसतेय. सुखदाच्या घरामध्ये काम सुरु आहे हे तिच्या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन स्पष्ट होतंय. 


सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. ती सध्या अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारते आहे. सुखदाने धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आहे.

Web Title: Actress Sukhada khandkekar bikini in home renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.