मराठी मालिकाविश्वातील ही अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:07 IST2025-07-12T15:05:40+5:302025-07-12T15:07:50+5:30

मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

actress rutuja chipade from the Marathi serial world will soon become a mother, shared a photo of her baby bump and gave the good news. | मराठी मालिकाविश्वातील ही अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मराठी मालिकाविश्वातील ही अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे लग्नाची बेडी मालिकेतील काजल म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा चिपडे. तिचे नुकतेच डोहाळ जेवण साजरे करण्यात आले आहे. तिने बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री ऋतुजा चिपडे हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटोशूट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या फोटोशूटमध्ये तिने डार्क हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक सुंदर गोष्टीची सुरुवात. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


ऋतुजा चिपडे हिने स्वरूप कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाची बेडी मालिकेनंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. याआधी ती बायको अशी हवी, यशोदा, हिमालयाची सावली सुखी माणसाचा सदरा, डीव्होर्स के लिए कुछ भी करेगा या हिंदी सीरिज, नाटक, मालिकेतून ती झळकली आहे.

Web Title: actress rutuja chipade from the Marathi serial world will soon become a mother, shared a photo of her baby bump and gave the good news.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.