अभिनेत्री प्रेमा किरण यांनी दिला 'दे दणा दण' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 18:36 IST2022-01-05T18:34:49+5:302022-01-05T18:36:01+5:30
'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay) या कार्यक्रमात नुकतीच अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांनी हजेरी लावली होती.

अभिनेत्री प्रेमा किरण यांनी दिला 'दे दणा दण' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay) हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकारांनी सादर केलेले किस्से प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. प्रत्येक आठवड्यात कलाकार या मंचावर येऊन भन्नाट किस्से सांगून प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करतात. आगामी भागात अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) सहभागी होणार असून त्या गोल्डन जुबली 'दे दणा दण' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से सांगणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या याच्याशी निगडित कुठलीही आठवण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. त्यावेळी 'पोलीसवाल्या सायकल वाल्या' गाण्याच शूटिंग करताना काय धमाल झाली हे प्रेमा किरण 'हे तर काहीच नाय'च्या मंचावर सगळ्यांना सांगणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका हे तर काहीच नाय शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर
अक्षया देवधर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
‘हे तर काहीच नाही’ या कॉमेडी शोचं अक्षया देवधर सूत्रसंचालन करते आहे. अक्षयासोबत या शो मध्ये सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड देखील दिसणार आहेत. अनेक सरप्राइझेस प्रेक्षकांना या शोच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये अगदी शाहरुखपासून शरद केळकर पर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वे पर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत सर्व गोष्टी या मंचावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.