Prajaktta Mali: "लग्न करू की नको?”चाहत्याच्या कमेंटवर प्राजक्ता माळीनं दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली- 'माझा भरवसा नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:53 IST2022-11-21T13:13:50+5:302022-11-21T13:53:58+5:30
Prajaktta Mali : प्राजक्ता माळीनं चाहत्याच्या कमेंटवर दिलेल्या भन्नाट उत्तरानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Prajaktta Mali: "लग्न करू की नको?”चाहत्याच्या कमेंटवर प्राजक्ता माळीनं दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली- 'माझा भरवसा नाही'
Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताच्या चुलत भावाचा लग्नसोहळा पार पडला. यादरम्यानचे हिरव्या साडीतलं नवरीचं फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलं. हे फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले.
हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, चंद्र कोर अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केला. 'भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं. साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.' असं कॅप्शन तिनं या फोटोसह दिलंय.
भावाच्या लग्नात तुझ अस झालय किती न कसे फोटो काढू पण प्राजक्ता कधी मिळणार तुझ्या लग्नाचे लाडू...???, इतका शृंगार करून तुमचा आत्मा सुखावला आणि तुम्हाला पाहून आमचा जीव सुखावला...अशा कमेंट्स प्राजक्ताच्या फोटोवर चाहत्यांनी केल्यात आहेत. एका चाहत्याने तर थेट 'करु की नको लग्न मी सांगा' अशी कमेंट केली आहे. प्राजक्ताने यावर 'करुन टाका माझा काही भरवसा नाही' असा मजेशीर रिप्लाय देतं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ताच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर प्राजक्तानं नुकतीच लंडनहून नव्या सिनेमाचं शुटींग संपवून आली आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होस्ट करत आहे.