"अरे.. कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 08:00 IST2022-12-23T08:00:00+5:302022-12-23T08:00:02+5:30
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

"अरे.. कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होता. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या वेस्टर्न लूकमधले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने ब्लू कलरचा शिमरीमधला ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली आहे. एथनिक असो वा वेस्टर्न प्राजक्ता दोनही लूक तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करते. चाहत्यांना ही तिचे दोन लूक आवडतात. प्राजक्ताने फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर लगचेच व्हायरल होतात. प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
प्राजक्ताच्या फोटोवर एका युजरने लिहिले की,ड्रेस वापरुन झाल्यावर तो हातावरचा फुगा मला द्या बर्थ डे ला लावतो माझ्या... तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, अरे... कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू..आणखी एका युजरने म्हटले, अरे हे काय चाललंय??
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची लकडाउनमध्ये पाहायला मिळाली. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळत आहे.