अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:51 AM2023-03-23T11:51:00+5:302023-03-23T11:51:27+5:30

Prajakta Mali : मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Actress Prajakta Mali's comeback in the serial after almost 6 years, know about it | अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकेत काम करून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली आहे. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिने पाहिले आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरवले आहे. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

आता प्राजक्ता माळी आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे. तब्बल ६ वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहे. तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.


पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत.  त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आणखीन काय पाहायला मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.'पोस्ट ऑफीस उघडं आहे.',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारीत होते.

Web Title: Actress Prajakta Mali's comeback in the serial after almost 6 years, know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.