खुद्द अभिनेत्री निलु वाघेलानेच निर्मात्यांनी दीपिका सिंगचे मानधन बुडवल्याचे केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 18:00 IST2017-02-21T11:14:10+5:302017-02-21T18:00:32+5:30

'दिया और बाती हम' मालिका संपून जवळजवळ चार ते पाच महिने झाले आहे. या मालिकेचा दुसरा सिझनही ‘तू सूरज ...

Actress Nilu Vaghela has only made the makers of Deepika Singh's estrangement | खुद्द अभिनेत्री निलु वाघेलानेच निर्मात्यांनी दीपिका सिंगचे मानधन बुडवल्याचे केले मान्य

खुद्द अभिनेत्री निलु वाघेलानेच निर्मात्यांनी दीपिका सिंगचे मानधन बुडवल्याचे केले मान्य

'
;दिया और बाती हम' मालिका संपून जवळजवळ चार ते पाच महिने झाले आहे. या मालिकेचा दुसरा सिझनही ‘तू सूरज मैं सांज पिया जी’  या नावानेही रसिकांच्या भेटीला येणार असल्याचीही घोषणा करण्यात. आली मात्र अजूनही 'दिया और बाती' या मालिकेची मुख्य भूमिका साकारणारी दीपिका सिंग हिला तिचे मानधन मिळालेले नाहीय. याविषयी निलु वाघेलाला मालिकेच्या निर्मात्याकडून कलाकरांच्या मानधनावर प्रश्न विचारण्यात आले.यावर निलु वाघेलानेही बोलण्यास नकार देत घरातली गोष्ट घरातच राहु द्या, या सगळ्या गोष्टी बाहेर आणण्यात त्याचा तमाशा करण्यात काय फायदा आहे असे उत्तर यावेळी तिने दिले.तर दुसरीकडे निर्मात्यांनी संध्याची भूमिका साकारणारी दीपिकाला मानधन दिले नसल्याचे खुद्द भाभोची भूमिका साकारणारी निलु वाघेला या गोष्टीला नकारही देत नाहीय. निर्मात्यांनी मानधन बुडवले असल्याचे थेट उत्तर दिले नसले तरीही या गोष्टीला भाभोने नकारही दिला नाही. त्यामुळे दीपिका सिंग बरोबर निर्मात्यांनी दीपिकाचे मानधन बुडवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निर्मात्यांकडूनच तिचे 1 करोड 14 लाख रुपये घेणे बाकी असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. तर दुसरीकडे शूटिंग दरम्यान दीपिका ऊशीरा यायची त्यामुळे खूप नुकसान झाल्याचे निर्मात्याचे सांगितले.त्यामुळे दीपिकानेच 16 लाख देऊन ही नुकसानभरपाई करावी असे निर्मात्याने दीपिकाला पाठवलेल्या कायदेशीर तक्रारीत म्हटले आहे. शशी सुमन प्रोडक्शन हाऊसने दिपिकाच्या उशिरा येण्याबद्दल सिंटाकडे कधीच तक्रार केली नव्हती.खरे तर कलाकारांच्या अनप्रोफेशनल वागण्याबद्दल सिंटाला कळवणे आवश्यक असते.पण काहीही तक्रार न करता आता तिला थेट 16 लाखांचा दंड भरण्यासाठी डेबिट नोट पाठवण्यात आली आहे.दीपिकाच्या या तक्रारीबाबत सिंटाचे सचिव अभिनेता अमित बेहल यांनी सांगितले होते की, "दीपिकाची तक्रार इंडियन फिल्म अँड टिव्ही प्रोड्युसरर्स काऊन्सिलकडे सोपावण्यात आली आहे. सिंटा, फिल्म अँड टिव्ही प्रोड्युसरर्स काऊन्सिल, दीपिका आणि शशी-सुमीत यांना यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच त्यांना एकत्र बोलावण्यात येईल मात्र अजुनही याविषयी तोडगा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची मीटींग झाली नसल्याचे दीपिकाने म्हटले आहे.  

Web Title: Actress Nilu Vaghela has only made the makers of Deepika Singh's estrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.