आदिती सारंगधरने 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूला केलं होतं प्रपोज; पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:04 AM2023-05-08T11:04:08+5:302023-05-08T11:05:38+5:30

Aditi sarangdhar: आदितीने एका प्रसिद्ध क्रिकेटपटूला चक्क प्रपोज केलं होतं. मात्र, त्या बदल्यात तिला एक असं काही उत्तर मिळालं जे आजही तिच्या लक्षात आहे.

actress aditi sarangdhar proposed cricketer ajit agarkar and revealed about her love letter | आदिती सारंगधरने 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूला केलं होतं प्रपोज; पण....

आदिती सारंगधरने 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूला केलं होतं प्रपोज; पण....

googlenewsNext

उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे आदिती सारंगधर (aditi sarangdhar). गेल्या काही काळात आदिती तिच्या खलनायिकी भूमिकांमुळे चर्चेत येत आहे. सध्या ती 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत काम करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. यामध्येच तिने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील एक मोठं गुपित उघड केलं आहे.

आपल्या अभिनयामुळे चर्चेत येणारी आदिती यावेळी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आदितीने तिच्या क्रशचं नाव पहिल्यांदाच उघड केलं आहे. इतकंच नाही तर तिने एका प्रसिद्ध क्रिकेटपटूला चक्क प्रपोज केलं होतं. मात्र, त्या बदल्यात तिला एक असं काही उत्तर मिळालं जे आजही तिच्या लक्षात आहे.

“मी पहिल्यांदा अजित आगरकरला प्रपोज केलं होतं. मला तो खूप आवडायचा. ब्रेबर्न स्टेडियमच्या बाहेर मी त्याच्यासाठी तासान् तास थांबायचे. मी त्याच्यासाठी खूप पत्र लिहिली होती. ही सगळी पत्र मी आईला द्यायचे, आई म्हणायची मी पोस्ट करते. याच पत्रांपैकी एकात मी लव्ह लेटरल लिहिलं होतं. मला तू खूप आवडतोस आणि मला तुझ्याबरोबर डेटवर जायचं आहे, असं मी त्या पत्रात लिहिलं होतं. मी त्याला लग्नासाठी वगैरे प्रपोज केलं नव्हतं. आई म्हणायची मी तुझी पत्र देते पण एक दिवस मला माझा खण आवरताना ती सगळी पत्र त्यात मिळाली. आईने ती पत्र पोस्ट केलीच नव्हती. त्यामुळे ते डेट प्रपोजल माझ्याकडेच राहिलं,” असं आदिती म्हणाली.

दरम्यान, सध्या अदिती ‘चर्चा तर होणारच’ या नाटकात काम करत आहे. त्याचसोबत ती नवा गडी नवं राज्य या मालिकेतही झळकत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कमालीची चर्चा रंगत आहे.
 

Web Title: actress aditi sarangdhar proposed cricketer ajit agarkar and revealed about her love letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.