​हा अभिनेता परतणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 15:02 IST2016-11-15T15:02:02+5:302016-11-15T15:02:02+5:30

विनय पाठकने हिप हिप हु्र्रे या मालिकेत काम केले होते. या मालिकेची कथादेखील विनयनेच लिहिली होती. ही मालिका त्या ...

The actor will return to the small screen | ​हा अभिनेता परतणार छोट्या पडद्यावर

​हा अभिनेता परतणार छोट्या पडद्यावर

नय पाठकने हिप हिप हु्र्रे या मालिकेत काम केले होते. या मालिकेची कथादेखील विनयनेच लिहिली होती. ही मालिका त्या काळात खूप गाजली होती. या मालिकेमुळे विनय पाठकला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर भेजा फ्राय, खोसला का घोसला यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला. चित्रपटांमध्ये व्यग्र झाल्यानंतर विनय छोट्या पडद्यापासून दूरच राहिला. छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या सासू-सूनेच्या मालिकांमध्ये त्याला रस नसल्याने त्याने छोट्या पडद्यावर काम नाही करण्याचा निर्णय घेतला होता. पण एखादी चांगली मालिका आणि भूमिका असल्यास छोट्या पडद्यावर परतायचे असे त्याने काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. त्यामुळे आता तो एका मालिकेत झळकणार आहे. 
अमेरिकन मालिकांचे भारतीय व्हर्जन आपल्याला गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. एव्हरीबडी लव्हज रेमंड या मालिकेवरून सुमीत संभाल लेगा ही मालिका बनवण्यात आली होती आणि आता द लास्ट मॅन स्टँडिंग या मालिकेवरून एक मालिका शशी सुमीत प्रोडक्शन बनवणार आहे. या मालिकेत विनय पाठक प्रमुख भूमिका साकारणार आहे.
विनयसोबतच या मालिकेत एकता पाबरी, राकेश बेदी, अशनूर कौर, स्मिता बनसल यांसारखे कलाकारही झळकणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेचे दिग्दर्शन परमीत सेठी करणार असल्याचे म्हटले जात आहे. परमीतने दिलजले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात काम करण्यासोबतच बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे. 

Web Title: The actor will return to the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.