'नामकरण' मालिकेत रिमाताई यांची भूमिका ही अभिनेत्री साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 13:07 IST2017-05-20T07:37:00+5:302017-05-20T13:07:00+5:30
Show must go on 'नाकमकरण' या मालिकेत रिमा ताई दयावंती मेहता ही भूमिका साकारत होत्या. मंगळवारी त्यांनी पूर्ण दिवस ...

'नामकरण' मालिकेत रिमाताई यांची भूमिका ही अभिनेत्री साकारणार
Show must go on 'नाकमकरण' या मालिकेत रिमा ताई दयावंती मेहता ही भूमिका साकारत होत्या. मंगळवारी त्यांनी पूर्ण दिवस नामकरण मालिकेच्या सेटवर शुटिंगसाठी शूटिंग करत होत्या.अखेर नामकरण ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतली शेटवटी मालिका ठरली. खेरच्या श्वासापर्यंत रिमा ताई काम करत होत्या.त्यांच्या निधनाने त्यांची पोकळी भरून न निघणारीच आहे.शेवटी शो मस्ट गो ऑन म्हणत रिमा ताई साकारत असणारी दयावंती भूमिकेत आता अभिनेत्री रागिनी शाह झळकणार आहेत. रागिनी शाह या प्रसिद्ध गुजराती अभिनेत्री असून त्यांनी हिंदीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'दिया और बाती हम' या मालिकेत आपण त्यांना भाभोच्या सासूबाईंच्या भूमिकेत यापूर्वी पाहिले आहे. याशिवाय सरस्वती चंद्र, एक महल हो सपनों का, मेरा ससुराल या मालिकांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. नामकरण या मालिकेविषयी रिमाताईंने सिएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मला छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. केवळ चांगल्या कथेच्या मी शोधात होते. निर्माता, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ‘नामकरण’ या मालिकेच्या रुपाने चांगल्या कथेचा प्रस्ताव ठेवला अन् माझा शोध संपला. वास्तविक या मालिकेची कथा समाजाशी सलंग्नित असल्याने त्यामध्ये काम करण्याचा अनुभव खुपच रोमांचक आहे.तसेच जेव्हा महेश भट्ट यांनी मला ‘नामकरण’ या मालिकेची कथा ऐकविली, तेव्हा मला असे वाटले की, टेलिव्हिजनच्या इतिहासात काही तरी नवे घडत आहे. त्याचा मी भाग बनल्याचा मला आनंद होत असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.